तथाकथित निराधार उचलतात लाभ अन् खरे निराधार वंचित

61

निराधारांना आधार मिळावा  म्हणून शासनाने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना सुरू केल्या. पण या योजनांत समाविष्ट असलेल्या लाभार्थीची यादी तपासल्यास अनेक खऱ्या अर्थाने निराधार नसलेल्यांची नावे दिसतात तर ग्रामीण भागात अजूनही बरेच वास्तविक निराधार असूनही ते या लाभापासून वंचित आहेत. निराधारांना जीवनाच्या वार्धक्याच्या वयात काही आर्थिक मदत व्हावी म्हणून शासनाने संजय गांधी, श्रावणबाळ यांच्या नावाने निराधार योजना सुरू केल्या आहेत.

यात अनेक निराधारांना आर्थिक मदत मिळून त्यांचे जीवन सुकर झाले असले, तरी वाढते वय, प्रस्ताव सादर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करताना मदतीचा अभाव, अनेक प्रकारच्या व्याधींनी त्रस्त असल्याने प्रस्ताव सादर करू न शकणे, ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यात येणाऱ्या अडचणी या कारणांनी अजूनही ग्रामीण भागात बरेच वास्तविक निराधार या योजनेपासून वंचित आहेत ही वस्तुस्थिती आहे.

तर अनेक सधन नागरिकांची नावे यादीत पाहायला मिळतात हे देखील वास्तव आहे. निराधार असण्यासाठी ज्या अटी आहेत ते पाहण्याची जबाबदारी अधिकारी,अहो साहेब आमचे पहा….
 हात मजुरी करणारा माणूस काय करेल, विधवा महिला त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. कर्मचारी यांच्याकडे आहे. ते आपले काम कितीही चोखपणे करत असतील तरी चलाखी करणारे आपले जमवून घेतात. पण खरेच ज्यांना अजिबात आधार नाही व प्रस्ताव सादर करणेही त्यांच्या प्रकृतीमुळे शक्य नाही ते मात्र या लाभापासून वंचित असून, घरी खितपत पडले आहेत त्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संघटना, महसूल विभाग यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. पण तसे होत नसल्याने अजूनही बरेच लाभासाठी पात्र असलेले खरे लाभार्थी वंचित आहेत.