मूल : विवाहीतेची रेल्वे समोर येवुन आत्महत्या, दोन चिमुकले मातृप्रेमापासुन दुरावले शहरातील वार्ड क्रमांक 4 येथील रहीवाशी नंदु कामडे यांची स्रुषा कुणाली नरेश कामडे (26) हीने आज दुपारी 4 वा.चे सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटक समोर धावत्या रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या करुन जीवन संपविल्याची घटना शहरात घडली. रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालीने आत्महत्या केली त्या गाडीची गती घटनेच्या वेळेस हळु असल्याने कुणाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथुन चंद्रपूर येथे नेत असताना त्यांचे निधन झाले. मृतक कुनाली हीचे पती नरेश धान खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे तर सासरे स्थानिक सिध्दी विनायक मंदिरा समोर चहा चे दुकान चालवुन कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. कुनाली हीला 4 वर्षाचा मुलगा व 10 महिन्याची मुलगी आहे. आत्महत्या चे कारण अद्याप अस्पष्ट असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.