शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ भरा@३१ मार्च अंतीम मुदत

48

शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ भरा
महाडीबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा योजनेचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल कार्यान्वित केलेआहे. ३१ मार्च अंतीम मुदत आहे.विद्यार्थ्यांनी,महाविद्यालयांनीविद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ भरावे, असे आवाहन केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अद्यापपर्यंत  टक्के अर्ज भरल्याची नोंद आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ भरावे. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेल्या अर्जाची तपासणी करुन विहित मुदतीत सादर करावे. अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्यास व विद्यार्थीशिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण  जबाबदारी  प्राचार्यांची महाविद्यालयाच्या राहील. याची नोंद महाविद्यालयांनी घ्यावी.