पांदण रस्ताच्या कामाला भेट व मतदान जनजागृती

55

तालुक्यातील ताडाळा येथे सुरू असलेल्या पांदण रस्ताच्या कामाला मा. संवर्ग विकास अधिकारी, राठोड पंचायत समिती मुल यांनी ग्राम पंचायत ताडाळा, म. गां. रा. रोजगार हमी मध्ये सुरु असलेल्या पांदण रस्त्याचे काम येथे भेट दिली व मतदान जन जागृती केली.

नव मतदारांना नुसते नाव नोंदवून भागणार नाही तर त्यांनी मतदान करणे अपेक्षित आहे. आणि आपल्याला जे मत द्यायचे आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही दबावाला, प्रलोभनला बळी न पडता निर्भयपणे मत दिलं पाहिजे, असे मूल येथील बिडीओ राठोड यांनी आज सांगितले.

ग्राम पंचायत ताडाळा येथील सरपंच श्री. राहुल भाऊ मुरकुटे व ग्राम पंचायत सदस्या.. कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक व मजूर उपस्थित होते.