हळदी कुंकू कार्यक्रमातून शेकडो भगिनींना दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

59

मुल : सावित्रीबाई फुले यांचा अनुयायी असलेला बहुसंख्य माळी समाजाचा हळदी कुंकुम व मकर संक्रांत वाणाचा कार्यक्रम मा दुर्गा मंदिर आवारात आयोजित करण्यात आला.

याच दिनाचे औचित्य साधून मुल येथे उत्साहपूर्ण सक्रिय असलेल्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चंद्रपूर तालुका मुल तर्फे दि. २८ जानेवारी २०२४ ला आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करुन करण्यात आले.

या कार्यक्रमात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या मुख्य पदाधिकारी व तालुका संघटीका यांनी पर्यावरण संवर्धन बाबत आकर्षक नृत्य सादर करून वृक्ष किती महत्वाचे आहे.हे जनजागृती करुन उपस्थितसर्व महिलांचे लक्ष वेधून घेऊन एक नवा संदेश समाजाच्या महिलांना दिला.

तसेच सावित्री नसती तर या विषयावरील नृत्य महिला गृपणी सादर केला व वैयक्तिक नृत्य व अनेक समाज प्रबोधन गीत याप्रसंगी सादर केले.

पर्यावरणाचा संदेश नृत्यात नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी, मुल तालुका संघटिका वंदना गुरनुले, तालुका संघटिका नंदा शेंडे, तालुका संघटिका इंदु मांदाडे, तालुका संघटिका माधुरी गुरनुले, पर्यावरण प्रेमी संगीता गुरनुले, तरूणा रस्ते. बालगोपाल नाविन्य मोहुर्ले, पावणी लेनगुरे, राधा गुंडोजवार, रिद्धी गुरनुले आणि अवनी गुंडोजवार यांनी सहभाग घेऊन मान मिळविला.

कार्यक्रमाचे संचालन माधुरी नगूरे हिने केले. प्रास्ताविक शीतल रस्से हिने केले. आयोजक म्हणून शामलता बेलसरे, रत्नमाला ठाकरे, ज्योती चटारे, जया मोहुर्ले, शुभांगी शेंडे, नीलम गावतूरे आयोजक ग्रुप मधील सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.

आभार यामीना भेंडारे हिने मानले. कार्यक्रमाची सांगता केटलीच वान व आलूमात देऊन करण्यात आली.