26 जानेवारीची अधिसूचना रद् करा -अ.भा. महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनेची मागणी

61

1 फेब्रुवारी2024 ला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक मान. छगनराव भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शासनाला व आयोगाला सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने निवेदन देऊन मराठा समाजाला आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश त्वरित रद्द करावा याकरिता समता परिषदेच्या वतीने मुल येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांच्या नेतृत्वात संविधान चौकात आंदोलन करून माननीय तहसीलदार मूल यांना निवेदन देण्यात आले मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याची होळी करण्यात आली, तसेच मराठा आरक्षण बाबत हरकती नोंदणीचे पत्र समाजाला सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे पाठवण्यासाठी वितरित करण्यात आले.

    
मुख्यमंत्रयांनी मंत्रीमंडळात विश्वासात न घेता सगेसोयरे संदर्भात अधिसूचनेचा मसुदा प्रसिध्द करून शंभर रूपयाचे प्रतिज्ञापत्र दया व मराठा जात बदलवून कुणबीचे प्रमाणपत्र घेवून ओबीसी समाविष्ठ व्हा अशा प्रकाराचा अन्याय कारक निर्णय घेतला त्यामूळे ओबीसी समाजाला भयावह वातावरण निर्माण झाले आहेत.
ओबीसीच्या घटनात्मक आरक्षणावर ते बेकायदेशीर आक्रमक आहेत. 

29 सप्टेंबर 2023 च्या ओबीसीच्या सभेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी संघटनांना मराठा आरक्षणात ओबीसीच्या आरक्षणांना मुळीच धक्का लागू देणार नाही असे आश्वासन दिले होते मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध नाही परंतु ते ओबीसी मधून न देता स्वतंत्र द्यावे अशी मागणी आहे मराठा कुणबी नाही मागास नाही हे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालातून अनेकदा अधोरेखित झालेले आहे कुठल्यातरी उर्दू मोडी लिपीतील संभ्रमित व खोडतोड केलेल्या नोंदीनुसार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीत मागच्या दाराने ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे हा कायद्याचा भंग असून ओबीसी वर अन्याय आहे त्यामुळे बेकायदेशीर शिंदे समिती बरखास्त करून त्यांच्या शिफारसी प्रमाणे मराठा समाजाला दिलेली सर्व कुणबी प्रमाणपत्र रद्द करावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

महिला जिल्हा कार्याध्यक्ष सौ. शशिकलाताई गावतुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.रामभाऊ महाडोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुदासजी गुरूनुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. किसनराव वासाडे,समतापरिषद वओबीसी संघटनेचे कैलास भाऊ चलाख, ईश्वरजी लोणबले, प्रा.सुधीर नागोसे, माजी नगराध्यक्ष वासुदेव लोनबले,ओबीसी सेलचे गुरुदास चौधरी,  सुखदेवराव चौथाले, दादाजी येरणे,  विवेक मांदाळे, किशोर राऊत,अमित राऊत, कुमुदिनी भोयर, प्रा. प्रभाकर धोटे, नंदकिशोर शेरकी, डॉ. पद्माकर लेंनगुरे, बंडूजी गुरनुले, विक्रांत मोहूर्ले,नंदू बारस्कर, गुलाब शेंडे, विक्रम गुरनुले, राकेश मोहूर्ले,ओमदेव मोहुलें,,दुष्यात महाढोरे,प्रदिप वाढई,नामदेव गावतूरे, सौ शामलता बेलसरे,समता बन्सोडे, सौ. सीमा लोणबले, सौ .अर्चना चावरे, शालूताई गुरूनुले,श्वेता वाढई,रंजना निकुरे,रूपाली वाढई,  सौ.माधुरी दांडेकर,स्मिताताई गुरूनुले,वैशाली मशाखेत्री,तरूणा रस्से,सुनिता शेंन्डे,अश्विनी ग ुरूनुले,वैशाली निकुरे, उषा चुदरी,जया ढवस,सुरेखा गभणे,वर्षा लेनगूरे,भगवान चन्नावार,अशोक मारगूनवार ,मनोज लेनगुरे ,परशूराम शेन्डे,चक्रधर घोंगडे,प्रशांत भरतकरप्रदिप वाढई, प्रा. वंसत ताजाणे, दिलीप वारजूरकर,,विक्रम गुरूनुले,व छाया गावतूरे,भाउुजी लेनगूरे,सतीश राजूरवार,धर्मेन्द्र सुत्रपवार,चितरंजन वाढई,विजय भुरसे सर ,कुसुम रणदिवे,ज्योती सोनूले, रेखा शेंन्डे, रेखा मोहूर्ले,अर्चना लेनगूरे,छाया गावतूरे,प्रमोद मशाखेत्री, शामराव भुरसे,अशोक कामडे,रामदास गुरूनुले,चितरंजन वाढई ,दामोधर लेनगुरे,विनोद कावळे,दिपीक ठाकरे,नारायण वाढई,बंडू कोटरंगे,दिपक महोडोरे,, शामराव भुरसे,पंकज चैधरी,भुषण काटकर,पंकज लोनबले,सौरभ कडस्कर,रोषन गुरूनुले,साईल रामटेके,प्रविण लोनबले,रूपेश बुरांडे,रामदास लेनगुरे,तसेच शोकडो समता परीशदेचे सखल ओबीसी व विमुक्त भटक्या समाजाचे बंधू भगणि युवक युवती आंदोलनात सहभागी झाले.