शिक्षकांची २१ हजार ६७८ पदे भरणार, जाहिरातीला अखेर मुहूर्त

58

राज्यात शिक्षकांची २१ हजार ६७८ पदे भरणार, जाहिरातीला अखेर मुहूर्त
पहिल्याच दिवशी आठ हजार प्राधान्यक्रम जनरेट
पुणे : शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्धीस अखेर सोमवारी (दि. ५) मुहूर्त मिळाला. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमधील २१ हजार ६७८ रिक्त जागांवर शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या एक वर्षापासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी पहिल्याच दिवशी आठ हजार प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत.
पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या १२ हजार ५२२, राज्यातील १८ महापालिकेच्या २ हजार ९५१, ८२ नगरपालिका आणि परिषदेच्या ४७७ तसेच १ हजार १२३ खासगी शैक्षणिक संस्थांच्या ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ शिक्षकांची रिक्त पदांवर भरती होणार आहे. त्यामध्ये इयत्ता १ ते ५ वीच्या सर्वाधिक १० हजार २४० जागांसह इयत्ता ६ ते ८ वी – ८ हजार १२७, इयत्ता ९ आणि १० वी २ हजार १७६ तसेच ११ वी ते १२ वी १ हजार १३५ पदांचा समावेश आहे. यातील १६ हजार ७९९ पदे मुलाखतींशिवाय तसेच ४ हजार ८७९ पदे मुलाखत घेऊन भरण्यात येणार आहेत.
माध्यमनिहाय मराठी १८ हजार ३७३, इंग्रजी ९३१, उर्दू – १८५०, हिंदी – ४१०, गुजराथी १२, कन्नड – ८८, तामिळ ८, बंगाली ४, तेलुगू -२ याप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येतील.
पदभरतीसाठी
प्राधान्यक्रमाची
.
उमेदवारांची
कार्यवाही पूर्ण
झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध
करण्यात येईल, तसेच त्याबाबत संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
राज्यातील शाळांमध्ये रिक्त जागांच्या केवळ ७० टक्के रिक्त पदांवर सध्या शिक्षकांची भरती केली जात आहे. त्यामध्ये इंग्रजी शाळांच्या बळकटीकरणासाठी साधन व्यक्ती नियुक्त करायचा आहे त्यानुसार केंद्र शाळेस एक याप्रमाणे पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
असा करा प्राधान्यक्रम जनरेट
उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल दिले आहे. तसेच, उमेदवारांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी
https://tait२०२२.mahateacher recruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम
आठ तारखेपासून पदनिहाय पसंतीक्रमाची
सुविधा
पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा ८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून ०९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे.