फेसबुकवर जाहिरात पाहून खरेदी केलेली गाय पोहोचलीच नाही!

50

भेजगाव : आजच्या मोबाइल क्रांतीच्या युगात अनेक जण सोशल मीडियाचा वापर करीत असून, यातून अनेकांनी फसवणुकीचा बाजार मांडला आहे. मूल येथील भूमिहीन असलेल्या शेतकऱ्याने फेसबुकवरील गाय विक्रीची जाहिरात पाहत गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला अन् फसला. यात खरेदी केलेली गाय तर मिळालीच नाही, उलट १८ हजारांनी फसवणूक झाली. हा प्रकार ७ फेब्रुवारीला उघडकीस आला.फसगत झालेल्या शेतकऱ्याचे नाव अविनाश पुरुषोत्तम बोरकर, असे असून तो इंदिरानगर वॉर्ड मूल येथील रहिवासी आहे. घरी शेती नसली तरी दोन गायी आहेत. यातून तो उदरनिर्वाहसाठी दुधाचा व्यवसाय करतो. अविनाशने फेसबुकवरील अशोक शर्मा डेरी फार्म, जयपूर, राजस्थान यांची गाय विक्रीची जाहिरात पाहिली आणि अन् व्यवसाय वाढविण्याकरिता गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. जाहिरातीमधील संपर्क क्रमांकावरून संपर्क साधत गायीची किंमत विचारली. ४० हजार रुपये किंमत असलेल्या गायीचा तडजोडीनंतर ३४ हजारांत सौदा पक्का झाला. तीन हजार रुपये गुगल पेने पाठवून त्यांनी गाय बुक केली. ६फेब्रुवारीला गाय मूलच्या दिशेने निघाली, असा संदेश बोरकर यांना दिला गेला. ७ फेब्रुवारीला गाय मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असून, पोलिस चौकीचे नाव सांगून नऊ हजार पाचशे रुपये मागविले. परत डेअरी फार्मकडून फोन आला. नऊ हजार रुपये वेगळे व पाचशे रुपये वेगळे पाठवा. म्हणून बोरकर यांनी पैसे पाठविण्यास असमर्थता दाखवत पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी पैसे न देता पुन्हा पाच हजार पाचशे रुपयांची मागणी केली. भोळ्या शेतकऱ्याने पाच हजार पाचशे रुपये पुन्हा पाठवले. त्यानंतर फोन आला की, चार हजार रुपये पुन्हा पाठवावे लागतील, तेव्हाच गाय मिळेल. असे वारंवार फोन करून एकूण १८ हजार रुपये आरोपीने बोरकर यांच्याकडून ऑनलाइन मागविले. मात्र, अजूनही गाय मूलमध्ये पोहोचलीच नसल्याने आपली फसगत झाल्याचे बोरकर यांच्या लक्षात आले.पोलिसांत तक्रार दाखल फसगत झाल्याचे लक्षात येताच बोरकरयांनी मूल पोलिसस्टेशनमध्ये तक्रार दाखलकेली. मात्र, तेथीलपोलिसांनी हे प्रकरणसायबर सेलचे असल्यानेत्यांना सायबर चौकीत तक्रार दाखल करण्याचा दिला. त्यावेळी ठाणेदार सुमित परतेकी तिथे उप नव्हते. त्यांना याबाबत भ्रमणध्वनीवर माहिती देण्ट त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल करून घेतली. पुढील मूल पोलिस करीत आहेत.