अपंगाच्या विशेष कोट्यासाठी अपंगाची प्रशासनाकडे धाव

42

मूल प्रतिनिधी
मुल शहरात नव्याने बांधन्यात आलेल्या 61 दुकान गाळ्यामध्ये अपंग बांधवाना व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध होण्यासाठी अपंगासाठी दुकान गाळे राखीव करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहित कामडे यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवानी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्याकडे केली.
मुल नगरपालिका हद्दीत जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सुंदर असे 61 दुकान गाळे असलेले छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल उभे राहिले.त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुकान गाळ्याच्या लिलाव प्रक्रियेला सुरवात नगरपालिकेने केली आहे.अनुसूचित जाती,जमाती,भटक्या जमाती, आणी बेरोजगार सेवा सहकारी संस्था व लोकसेवा केंद्राकारिता दुकान गाळे आरक्षित करण्याकरिता नगरपालिकेने जाहिरात काढत 14 तारखेला सोडत ठेवली पण त्यात अपंग बांधवासाठी एकही राखीव दुकान नसल्यामुळे अपंग बांधवानी नाराजी व्यक्त करीत जाहिरातीमध्ये अपंगासाठी राखीव कोठा ठेऊन अपंग बांधवाना व्यवसाय करण्याची संधी द्यावी अशी मागणी मुल चे उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद मुलचे प्रशासक विशाल मेश्राम यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहित कामडे यांच्या नेतृत्वाखाली केली.
समाजामध्ये अपंग बांधवाना मानाचे स्थान मिळावे.त्यांचा जीवनमान सुधारावा यासाठी अलीकडील काळात शासन वेगवेगळ्या योजना आणुन अपंगासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे.अगदी काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अपंगाना बसस्थानकावरील दुकान गाळे राखीव ठेवण्याची घोषणा केली. शासन प्रत्येक बाबीमध्ये अपंगाना राखीव कोठा ठेऊन त्याच्या सोबत न्याय करताना दिसत असताना मुल नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील दुकान गाळ्याच्या जाहिरातीत एकही दुकान गाळे अपंग बांधवासाठी राखीव नं ठेवल्यामुळे अपंग बांधवानी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे हा अपंग बांधवावरील अन्याय दूर कारण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहित कामडे यांनी अपंग बांधवाना सोबत घेत प्रशासक विशाल मेश्राम यांची भेट घेऊन जाहिरातीत सुधारणा करीत अपंग बांधवाना काही दुकान गाळे राखीव करावे ही विनंती केली.यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आकाश येसणकर,योगेश शेंडे,अमन रायपुरे,वसंत कडस्कर,स्वप्नील ऐनप्रेडीवार,अंकुश वाढई आदी उपस्थित होते.