शासन मार्कंडास्थित महामृंत्युजय मार्कंडेय देवस्थानचा विकास करणार
पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार
राज्याचे विकासपुरुष व शासनाचे वन,सांस्कृतिक, मत्स्यव्यवसायमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी मार्कंडास्थित महामृंत्युजय मार्कंडेय देवस्थानाचे विकास करण्याचे व बल्लारपूर येथील मार्कंडेय मंंदीरासमोरचा छत बांधुन देण्यार असल्याचे आश्वासन विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बल्लारपूर पद्मशाली समाजाला देऊन समाजबांधवाना शुभेच्छा दिल्या.
श्री मार्कंडेय पद्मशाली समाज सेवा समीतीच्या वतीने बलारपुर येथील मार्कंडेय मंंदीरात मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव व बालाजी मंदिरापासून मार्कंडेय मंंदीरापर्यत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.
या भव्य शोभायात्रेचे उद्घाटन वनविकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी केले.प्रमुख अतिथी भाजप जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा,शहर अध्यक्ष कांशीसिंग, समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ.बंडूभाऊ आकनुरवार,समाज अध्यक्ष मनीष रामील्ला, सचिव डॉ. अनिल बोम्मावार, प्रभारी जिल्ह्य सचिव तुलशीदास मारशेट्टीवार, सल्लागार निवृत्त आरफओ साईविलास बासनवार,रमेश बल्लेवार, मदन मेनेवार,उपाध्यक्ष सुरेश नाडमवार, सहसचिव योगेश वडलकोंडावार,कैलाश दासरवार,नंदुजी नाडमवार, नारायणजी मार्गनवार,सौ.संगिता मेनेवार, सौ रंजना बोम्मावार,सौ मीनाताई नाडमवार होते.सर्वप्रथम हवन अभिषेक पुजा करून भव्य कलश शोभायात्रेचे उद्घाटन मार्कंडेय ऋषी व भगवान शंकराची पुजा करण्यात आली.यावेळी हरीशजी शर्मा,कांशीसिंग व डॉ.बंडूभाऊ आकनुरवार यांनी शासन स्तरावरील 2% स्वतंत्र एसबीसी आरक्षण व रोजगारासाठी महर्षी मार्कंडेय आथीँक विकास महामंडळाबाबत मनोगतात व्यक्त केले. या महोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन डॉ. अनिल बोम्मावार आभार योगेश वडलकोंडावार यांनी केले.या महोत्सवाचे यशस्वीतेसाठी नरेश दासरवार,शंकर पड्यालवार,नविन गड्डमवार,सतीश मार्गनवार,सौ.एलवाका, सौ.स्वाती वडलकोंडावार, सौ रूपाली दासरवार व समाज बांधव,महीला यांनी सहकार्य केले.महोत्सवात शेकडो समाज बांधव,महीला उपस्थित होते.महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली.
शब्दांकन- डॉ.बंडू आकनुरवार जिल्हाध्यक्ष,पद्मशाली समाज चंद्रपूर