सुशी दाबगावात सर्जागड प्रकल्प विरोधात विविध मागण्या घेऊन तीव्र आंदोलन मागण्या तत्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन राजू झोडे

64

सुशी दाबगाव प्रतिनिधी ,मुल तालुक्यातील सुशी दाबगावं गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सूर्जागड येथील लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून त्या वाहतुकीमुळे व होणाऱ्या प्रदूषणामुळे सुशी दाबगावं वाशिय नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. यावर प्रशासनाने तत्काळ उपाय योजना करावी यास्तव उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष रजुभाऊ झोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या बहुसंख्य युवकाच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानुसार आज सुशी बसस्थानक परिसरात अनेक युवकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आला असून तसे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकार्जून इंगळे, ठाणेदार सुमित परतेकी, ना. तहसीलदार कुमरे याना देण्यात आले.

गडचिरोली सुर्जागड येथील लोह खनिज उत्पादन करण्याऱ्या कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणात मुल तालुक्यातील सुशी गावातून लोहखनिज याची जड वाहतूक गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात रस्त्याची वाट लागली असून प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. गावातील छोटी मुले गर्भवती माता स्थनदा माता नागरिकांना स्वसणाचे डोळ्याचे असे विविध आजाराला सामोरे जावे लागत असून आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाल्या आहे. परिणामी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जिल्हा परिषद शाळा, व आश्रम शाळा यांनाही मोठा धोका झालेला असून रस्त्यालगत असल्याने ब्रेकर अभावी अपघात होऊन जीव जाण्याचं धोका नाकारता येत नाही. तसेच गावातील अनेक सुशिक्षित युवक बेरोजगार असून गावातील युवकांना रोजगार मिळावा असे विविध समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. याची शासनस्तरावरून तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी सुशी वाशियाना घेऊन उलगुलान संघटनाचे वतीने करण्यात आला आहे. याची योग्य दखल न घेतल्यास समोर मोठे आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे.

त्यावेळी उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ झोडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शेंडे , श्यामभाऊ झिलपे, पत्रकार दुर्वास घोंगडे ,रुपेश कोठारे,मगेश कपाट, रुपेश निमसारक,कविश्र्वर कपाट,अमोल बोरसरे,मोहन बुरांडे, पंचशील तामगाडगे,सिताराम भांडेकर, नंदाजी भांडेकर,बंडू सोमनकर, पंकज तावाडे. महेश सातपुते, सुनील भांडेकर, अंकित बुरांडे, आदि गावकरी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.