मूल तालुक्यातील मरेगाव शिवारात वाघाने हल्ला केल्याने गुराखी गंभीर जखमी झाला. ही
घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आशिष राजू दुधकोवर (१८) असे जखमीचे नाव आहे. आशिष दुधकोवर हा मरेगाव शिवारात शेळ्या राखण्यासाठी गेला होता. दरम्यान, विश्वेश्वर पेंदोर यांच्या शेताजवळील झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. जवळच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली.