ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूलचा अभिनव उपक्रम

54

रथसप्तमी प्रवासी दिवस म्हणून साजरा

ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने शहरातील बसस्थानक, खाजगी बसथांब्यावर आणि रेल्वे स्थानकावर , बसचालक, वाहक, नियंत्रक, प्रवासी वयोवृद्ध, महिला व विद्यार्थी , रेल्वे चालक , तिकीट तपासणीसांसह, गार्ड व रेल्वे कर्मचारी  यांचेशी वार्तालाप करीत त्यांच्या कार्याची दखल घेत गुलाब 🌹 पुष्प देऊन त्यांचे   स्वागत व अभिनंदन करण्यात आले.ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी महाराष्ट्रातील समस्त शाखांना रथसप्तमी प्रवासी दिवस म्हणून साजरा करीत , प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या वतीने शहरातील प्रमुख वाहतूक स्थानकावर ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बसस्थानक मूल परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,ह्या कार्यक्रमात बसस्थानक नियंत्रक विभा बोथले यांचे अध्यक्षस्थानी होत्या,तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा अध्यक्ष दीपक देशपांडे, उपाध्यक्ष, अशोक मैदमवार, संघटक, तुळशीराम बांगरे, सहसंघटक, राहूल आगडे, कार्यकारिणी सदस्य, रमेश डांगरे, व परशुराम शेंडे ,नियंत्रक अनिल पायतोड ,माजी कर्मचारी नवाब पठाण ,विजय बटे , सत्कारमूर्ती चालक, मनोज तेलसे ,वाहक टिकाराम येल्लोरे आणि इतर चालक वाहक व मोठ्या प्रमाणात प्रवासी , विद्यार्थी, विद्यार्थीनी , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांचे गुलाब 🌹 पुष्प देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले 

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रथसप्तमी प्रवासी दिवसांच्या आयोजनाची पार्श्वभूमी समजावून सांगत दीपक देशपांडे यांनी केवळ प्रवासच नाही तर चालक वाहक आणि वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा काही समस्या असू शकतात ,त्या समस्या आमच्यापर्यंत आल्या तर त्या समस्या प्राधान्याने अधिकारी कर्मचारी यांचेशी संवाद साधून चर्चा करून सोडवणुकीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याची ग्वाही दिली,आणि समस्या मांडण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, आपल्या अधिकारांप्रती जागरुक झाले पाहिजे आणि ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती घेतली पाहिजे असे आवाहन केले.

अशोक मैदमवार यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या कार्याची माहिती दिली आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठीआम्ही प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले.

तुळशीराम बांगरे यांनी प्रवासी महासंघाची आवश्यकता पुढे ठेवली तर राहूल आगडे यांनी प्रवाशांना सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असा विश्वास प्रकट केला.

याप्रसंगी नागरिक व विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी आपल्या समस्या मांडल्यात,त्यांचे निराकरण करण्यासाठी वाहतूक नियंत्रक यांचे सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल त्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन मूलच्या वाहतूक नियंत्रक विभा बोथले यांनी याप्रसंगी दिले.

खाजगी वाहतूक करणाऱ्या बसथांब्यावर मूल येथील संचालक विजय चिलके यांचेसह प्रवासी , वाहनचालक,वाहक यांचेही गुलाब 🌹 पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डांगरे यांनी केले,याप्रसंगी बोलताना दीपक देशपांडे यांनी खाजगी वाहतूक करणाऱ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत , पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व प्रवाशांना सुखरूप त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षीत पोहोचवावे अशी मागणी करीत सहकार्य करण्याचे आवाहन केले,तर खाजगी वाहतूक करणाऱ्यांचे वतीने तसा प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली.

रेल्वे स्थानकावर गाड्यांची वेळ बरोबर पाळल्या जात नसल्याने प्रवासी संख्या कमी होत असावी असा संशय उपस्थित प्रवासी बांधवांनी बोलून दाखविली तर , वेळेचे नियोजन केले गेले तर आम्ही वेळेत गाडी पोहोचवू शकतो असे मत रेल्वेचालक यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम शेंडे यांनी केले.

 

लांब पल्ल्याच्या गाड्यांना मूल येथे थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने मूल येथे चंद्रपूर जबलपूर गाडीसह लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा अशी अपेक्षा यानिमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली.

यानिमित्ताने रेल्वेचालक जी.हरीकृष्णा, सहकारी परमवीर व गार्ड एम.एन.रंगारी यांचे गुलाब 🌹 पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच रेल्वे कर्मचारी दिनेश दिनकर,राष्ट्राला खोब्रागडे, यांचेही गुलाब 🌹 पुष्प देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने प्रवासी बांधव व महिला प्रवासी उपस्थित होते ,त्यांचेही गुलाब 🌹 पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

 याप्रसंगी उपस्थित प्रवाशांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या मूल तालुका शाखा मूल चे कार्याचे व या उपक्रमाचे कौतुक केले व यांमुळे प्रवासी, वाहतूक संचालनकर्ते व संघटना यांच्यामध्ये एक जवळीक साधून शंका, समस्या तातडीने मार्गी लावता  येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.

अशारीतीने  ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूलचे वतीने रथसप्तमी प्रवासी दिवस एका अनोख्या रुपात साजरा करण्यात आला.