संत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

40

संत तुकडोजी महाराज चिखली येथे, वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना दिनांक १७/२/२४ शनिवारला निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉ. प्रा. विठ्ठलराव चौथाले सर संत तुकडोजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एच. रामटेके, प्राध्यापक दुर्वास सर, प्राध्यापक रामटेके सर, स्वप्निल नवघडे, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक आपली मनोगत व्यक्त केली व महाविद्यालयीन प्रवासाला अनेक जुन्या आठवणींना आळा दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे व शिक्षकांचे आभार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी श्री जय हनुमान क्रीडा मंडळ चिखली तर्फे इयत्ता बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पेन व पेपर पॅड वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष चौथाले सर यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या प्राचार्य रामटेके सर यांनीही विद्यार्थ्यांना आपले बहुमोल मार्गदर्शन केले, प्राध्यापक कळस्कर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या तसेच प्राध्यापक रामटेके सर यांनीही मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी लीना भोंगारे व आभार प्रदर्शन प्रज्वल मंडलवार यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.