कौटुबिंक स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा मूल तालुका पत्रकार संघाचे आयोजन

46

मूल :- येथील मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. पत्रकार भवनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत पत्रकार संघाच्या सदस्यांनी आणि कुटुंबातील महिलांनी हिरीरीने सहभाग घेतला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले.पत्रकार म्हणून समाजात वावरत असताना वृत्तांकनाच्या निमित्ताने अनेकदा धावपळ करावी लागते.त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो.कुटुंबाकडे आणि पाल्यांच्या भेडसावणा-या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होते.त्यासर्व गोष्टीवर मात करण्यासाठी कुठेतरी एक दिवस आनंदाचा निर्माण व्हावा,त्यासाठी कौटुंबिक स्नेहमिलन सोहळयाची संकल्पना मांडण्यात आली.18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या या सोहळयात महिला आणि कुटुंबासाठी अंताक्षरी स्पर्धा,पासिंग पिलो गेम,बायकोच्या कपाळावर टिकली लावणे,संगीत खुर्ची स्पर्धा,लहान मुलांचे एकल नृत्य घेण्यात आले. यात नुतन गोवर्धन, राजू गेडाम,रमेश माहूरपवार,धनश्री रेकलवार,तनुजा गोवर्धन,शरयु माहूरपवार,आणि विनायक रेकलवार यांनी बाजी मारली. या सर्व स्पर्धाचे आणि सोहळयाचे नियोजन वर्षा पडोळे,मंगला गेडाम,नुतन गोवर्धन,माधवी गुरनूले,चेतना रेकलवार,अर्चना चावरे,भुवनेश्वरी माहूरपवार,मेघा बोकारे,दर्शना देशपांडे यांनी केले. छोटेखानी झालेल्या बक्षिस वितरण समारंभात पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम ,जेष्ठ सदस्य संजय पडोळे,चंद्रकांत मनियार,गुरू गुरनूले,अशोक येरमे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस आणि पत्रकार संघाच्या कुटुंबातील महिलांना प्रेशर कुकर भेट देऊन सन्मान करण्यात आला. स्नेहभोजनाने या सोहळयाची सांगता करण्यात आली.सोहळयाचे संचालन मंगला गेडाम यांनी केले.सर्वांचे आभार चेतना रेकलवार यांनी मानले. कौटुबिंक सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजू गेडाम,दीपक देशपांडे,संजय पडोळे, चंद्रकांत मनियार,गुरू गुरनूले,वासूदेव आगडे,भोजराज गोवर्धन,रमेश माहूरपवार,अशोक येरमे,रविंद्र बोकारे,गंगाधर कुनघाडकर, युवराज चावरे,विजय पाखमोडे, विनायक रेकलवार यांनी अथक परिश्रम घेतले.