नवभारत विद्यालय मुल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

26

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री अशोकराव झाडे सर, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. किसनराव वासाडे सर, प्रा. पुस्तोडे, प्रा. धोटे,प्रा. येरोजवार, जेष्ठ शिक्षक गुरूदास चौद्यरी, सौ. वर्षा भांडारकर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा द्विपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किसनराव वासाडे सर यांनी केले. त्यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा ” हे राज्यगीत श्री. भारत सलाम, निलेश माथनकर, विकास मोडक, सौ.वर्षा भांडारकर यांनी सादर केले.
शाळेत मातीपासून गड किल्ले तयार करण्यात आले. चित्र तयार केली. निबंध स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
विद्यार्थी प्रतिनिधी ओम फलके, स्नेहल कावळे, श्री गुरूदास चौधरी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील.

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला. असे विचार स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माथनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विकास मोडक यांनी मानले.याप्रसंगी राजू बोढे, पूनमचंद वाळके, ताराचंद निमसरकार,सुनिल चौधरी, सचिन आत्राम, आनंदराव फलके,शिपाई अनिल खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.