शिवरायांना मानाचा मुजरा : शोभायात्रा शिवछत्रपतींच्या जयघोषाचा निनाद

50

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त मुल शहर भगवामय झाल्याचे चित्र सोमवारी दुपारपासून पहावयास मिळाले. सायंकाळी गांधी चौक मार्गे निघालेल्या शोभायात्रेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांचा गजर, उंचावले जाणारे भगवे ध्वज आणि ‘जय शिवाजी’ या घोषणांमुळे वातावरण शिवमय झाले होते.
मुल शहरातील सर्व चौकांमध्ये जल्लोष दिसून आला. शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषा साकारून सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानांचे आयोजन पार पडले. शिवाजी जन्मोत्सवाचा पोवाडा विद्यार्थ्यांनी गायला.  शोभायात्रेत डीजेच्या तालावर मावळ्यांनी विविध झॉक्या प्रस्तुत केल्या.
 शिवभक्तांकडून डीजेच्या तालात मिरवणूक काढली गेली. शोभायात्रा व मिरवणुकीला शहरवासीयांचा दमदार प्रतिसाद लाभला. शहरात अन्य ठिकाणी आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. गांधी चैकातून मार्गक्रमण करताना युवकांनी ढोलताश्यावर अशा ठेका धरला होता.