प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी यांच्या हस्ते पिएमउषा प्रकल्पाचे लाईव्ह प्रसारण

44

पंतप्रधानांच्या हस्ते आज पीएम उषा प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान ;पीएम. उषा योजनेला मंजुरी दिली त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी प्राप्त झाला

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पी एम- उषा) योजनेला मंजूरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च रु. १२ हजार ९२६.१० कोटी इतका आहे. राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना समानता, प्रवेश आणि उत्कृष्टतेची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी निधी  पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेच्या प्रकल्प मंजुरी मंडळाने १७ आणि १८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत बहु-विषय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठे घटकांसाठी विद्यापीठांना मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी प्राप्त झालाय.

या योजनेची वैशिष्ट्ये : 
– दर्जेदार शिक्षण आणि शिक्षण प्रक्रियेच्या विकासावर भर देणे
– मान्यता नसलेल्या संस्थांची मान्यता सुधारणे
–  डिजिटल पायाभूत सुविधांवर भर देणे
– मल्टीडिसिप्लिनरी मोडद्वारे रोजगारक्षमता वाढविणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० फेब्रुवारी २०२४ रोजी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पाचे डिजिटल लॉंचिंग होणार आहे.

त्याअनुषंगाने उपरोक्त योजनेची सुरुवात करण्याकरीता मंगळवार २० फेब्रुवारी २०२४ रोजी शिक्षा मंत्रालय, उच्चतर शिक्षा विभाग, भारत सरकार यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी, सकाळी ११:३० दुरदृश्य प्रणाली द्वारे  (थेट) मार्गदर्शन

  २० फेब्रुवारीला आज कर्मवीर महाविद्यालय मूल येथे आज 11.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लाँचिंग होते. ऑनलाइन संवादही साधले .

कर्मविर महाविद्यालय मूल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला आहे . उपस्थित प्राचार्य डाॅ.अनिता वाळके तसेच प्राध्यापक वृंद व प्राध्यापिका, विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच ज्येष्ठ पत्रकार दिपक देशपांडे ज्येष्ठ पत्रकार मनियार सर,मशाखेत्री पत्रकार आभासी पद्धतीने उपस्थित होते.