मुल मध्ये बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

64

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली असून मुल तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर ९२२ विद्यार्थ्यांनी पेपर दिला.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या वतीने आज दिनांक २१फेब्रुवारी २०२४पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून मूल नगरात ती दोन केंद्रावर शांततेत पार पडत आहे.

नवभारत विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे ४७७ विद्यार्थी परीक्षेस सामोरे जाण्यासाठी नोंदणीकृत आहेत मात्र त्यापैकी आज इंग्रजी विषयाच्या पेपरला त्यापैकी ४विद्यार्थी अनुपस्थित आहेत आणि कर्मवीर महाविद्यालय मूल येथे ४३०नोंदणीकृत विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत त्यापैकी सात विद्यार्थी अनुपस्थित होते.म्हणजेच दोन्ही केंद्रावर एकूण ९३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी आज एकुण ११विद्यार्थी अनुपस्थित होते म्हणजेच एकुण ९२२विद्यार्थी परिक्षेला बसले असून त्यांची परीक्षा शांतपणे सुरळीत सुरू आहे.नवभारत विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे काटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरु असून कर्मवीर महाविद्यालय मूल येथेप्रा.डाॅ.अनिता वाळके यांचे मार्गदर्शनाखाली बनकर व सेलेकर सर परीक्षेची व्यवस्था बघत आहेत.

दोन्ही केंद्रावर पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे परीक्षा केंद्र मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने व बऱ्याच वर्गखोल्या पहिल्या दुसऱ्या मजल्यावर असल्याने बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी असणार आहे मात्र परीक्षा केंद्राच्या आत काय घडणार आहे याबाबत पालक , विद्यार्थी हे चिंताक्रांत असू शकण्याची शक्यता आहे.शाळेमध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेचे मिळून  विद्यार्थी परीक्षेत बसले असल्याची माहिती शाळेचे केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक यांनी दिली. तर शाळेच्या परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याची माहिती  दिली. बारावी परीक्षेसाठी दोनच केंद्र असल्याने या विद्यालयात परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती  दिली.