पिपरी दिक्षितची शाळा म्हणजे छोटा पॉकेट बडा धमाका

57

सुशी दाबगावं प्रतिनिधी;-  महाराष्ट्र राज्य पुरस्कृत अत्यंत मानाच्या आणि चुरशीच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुक्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधून तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकवला आहे.
शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, मातापालक, विध्यार्थी, पालकवर्ग,युवकमंडळ आणि गावकरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
सरपंच सौ. श्वेता उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम पाल, उपाध्यक्ष सौ. भाग्यश्री ढोंगे, सदस्य – मुन्ना टेकाम, अरुणभाऊ सोयाम, प्रवीण पाल, चरनदास देवतळे, राकेश मेश्राम, निलिमा जुवारे, जयश्री पिपरे, पल्लवी टेकाम, वेणूताई जुवारे तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख कोकुलवार, यासह माता पालक संघ सदस्य, युवावर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामपंचायत उपसरपंच देवराव पिपरे, सदस्य -चरनदास अलाम, अरविंद वनकर, बेबीताई वाकूडकर, कुंदा कोडापे, वर्षा डोंगरे, सुनीता दहिवले यांनी शाळा व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक शंकर चिचघरे आणि शिक्षिका सौ. संगीता दुरुतकर यांनी सर्वांचे आभार मानले आहे.