चंद्रपूर यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई १३७+९= १४६ (९ बॅण्डस्मन) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र

55

पोलीस शिपाई भरती २०२२ – २०२३
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३/०६/ २०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई १३७+९= १४६ (९ बॅण्डस्मन) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीव्दारे दिनांक ०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत स्विकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहीती policerecruitment२०२४.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली
आहे.
• उमेदवारास पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment२०२४.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
• उमेदवार एका पदाकरिता संपुर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो.
उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. • भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के
गुण मिळविणारे उमेदवारांमधुन संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
• सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने
ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
• शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमुद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मुळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसुचीमध्ये समावेश केला जाईल.
निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि. १०/१२/२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
• पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहीती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहीती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सुचना policerecruitment२०२४.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहु जाहिरात उमेदवरांनी काळजीपुर्वक वाचुन, समजून घ्यावी. तसेच सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
• भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परीस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
• उमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतु खुल्या प्रवगार्तील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत. • पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहुन व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर संलग्ण याचिकांमध्ये दिनांक २७/०६/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहुन रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहीती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.पोलीस अधिक्षक, चंद्रपुर असे एका वृत्तपत्रात दिलेले आहे.

भरतीचे नियम, सूचना आणि शासन निर्णय

  • पोलीस भरती मधे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील सर्व नियम लक्षपूर्वक वाचून नंतर च या साठीचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • उमेदवारांना या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई या पदाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करता येईल. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त एका घटकात आणि एकच  पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकतो याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • पोलीस शिपाई भरती प्रक्रिया मधे सुरुवातीला उमेदवारांची 50 मार्क्स ची शारीरिक चाचणी (Physical Test) घेण्यात येईल आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र मधे एकाच वेळी प्रतेक घटकात लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • म्हणजेच शारीरिक चाचणी ल सामोरे गेल्यावरच उमेदवारांना लेखी परीक्षा करीता बसता येईल याची नोंद घेऊनच ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची खोटी किंवा अविश्वसनीय माहिती नोंदविली तर तो उमेदवार भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यातून बाद केल्या जाईल याची नोंद घ्यावी.
  • शारीरिक चाचणी मधे किमान 50% गुण मिळवणाऱ्या च उमेदवारांना लेखी परीक्षेस बसता येईल. आणि एका जागेसाठी 10 उमेदवार याप्रमने तितक्या उमेदवारांना 100 मार्क्स ची लेखी परीक्षा देता येईल.
  • लेखी परीक्षा मधे प्रतेक उमेदवाराने किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य असेल आणि यापेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रिया मधून बाद करण्यात येईल.
  • संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व पोलीस घटक यामधे एकच वेळी लेखी परीक्षा घेतल्या जात असल्याने अर्ज करताना उमेदवाराने याची दखल घ्यावी.
  • वर दिलेल्या अटी आणि नियम यानुसार जे उमेदवार शारीरीक चाचणी पूर्ण करून लेखी परीक्षा मधे येऊन पात्र ठरतील यांची एक निवड यादी लावण्यात येईल. या निवड यादी नुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता बोलावले जाईल. हे उमेदवार कागदपत्र पडताळणी मधून पात्र होतील त्यांची एक तात्पुरती यादी (Provisional List) बनवण्यात येईल आणि शारीरिक व लेखी चाचणी मधील एकूण गुणांचा विचार करून शासन नियमानुसार शेवटच्या टप्प्यात त्यांची अंतिम निवड केल्या जाईल.
  • पोलीस शिपाई पदा करीता ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक असलेली कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, आरक्षण असेल तर ती कागदपत्रे, शारीरिक चाचणी देण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, परीक्षा फीस आणि बाकी सर्व बाबींचा विचार करून किंवा अधिकृत संकेतस्थळ वर माहिती घेऊनच उमेदवारांनी सदर अर्ज करावा.
  • जाहिरात मधे नमूद केली जाणारी प्रवर्ग निहाय, आरक्षण निहाय रिक्त पदे, समांतर आरक्षण नुसार रिक्त पदे या सर्वांचा विचार करून आणि त्यांचे निरीक्षण करून च उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यात दिले जाणारे वेळापत्रक त्या उमेदवाराने पाळणे अनिवार्य असेल. अन्यथा दिलेल्या तारखेस शारीरिक चाचणी किंवा लेखी परीक्षा करीता उमेदवार गैरहजर राहिल्यास त्या भरती प्रक्रिया मधून त्याला बाद करण्यात येईल.
  • त्यामुळे उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की दिलेली तारीख आणि वेळ यामधे कोणत्याही स्तरावर बदल केल्या जाणार नाही.
  • अर्ज करताना उमेदवाराने स्वतच्या प्रवर्ग करीता रिक्त जागा आहेत की नाही याची तपासणी करावी. तसेच प्रतेक प्रवर्ग च उमेदवार खुल्या प्रवर्ग करीता अर्ज करू शकतो हे ही लक्षात ठेवावे. परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार फक्त खुल्या जागांसाठी च पात्र असतील हे ही लक्षात ठेवावे.
  • सदर पदभरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांची सर्व रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Faqs About- policerecruitment2024.mahait.org

1. मी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

policerecruitment2022.mahait.org या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.

2. उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का?

उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

3. मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल?
ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन भरणा – पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरणा करू शकता.
4. ऑनलाईन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा/इंटरनेट जोडणी खंडित झाली. मी काय करावे?
तुम्ही पुन्हा ऑनलाईन याल, तेव्हा शुल्क भरणा पर्याय निवडून पुन्हा भरणा करू शकता.
  • भरणा प्राप्त झाल्यास तुम्ही आवेदन अर्ज प्रिंट करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवू शकता.
  • भरणा प्राप्त न झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल.
5. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल?
तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.
6. मी आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. मला अर्ज शुल्क परत मिळेल काय ?

नाही. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

7. ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत मी अनेक मोड्युल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे. आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मला एका/अनेक रकान्यांमधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. मला ते कसे करता येईल ?
तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मोड्युल्समधील माहिती अद्ययावत/ बदल करू शकता (नोंदणी तपशील वगळता). यंत्रणेमार्फत तुम्हाला पूर्ण केलेल्या अर्जाचे पूर्वदृश्य दर्शविले जाईल. ही माहिती योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
8. स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे?
छायाचित्र आणि स्वाक्षरी जेपीईजी/पीएनजी/टीआयएफएफ स्वरूपातच स्कॅन करणे आवश्यक आहे.
9. ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे, त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी मी कोठे संपर्क साधावा?
तुम्ही mahapolicerecruitment.support@mahait.org येथे ई-मेल द्वारे अथवा 022-61316418 या आमच्या मदत कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू सकता.
10. मी पासवर्ड विसरलो/विसरले तर ?
  • मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा.
  • सादर करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल.
  • अन्यथा 022-61316418 ह्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा
11. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल काय?

होय. अर्ज रद्द करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज रद्द करू शकता. मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकता.