एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ@अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशाकरिता

50

अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशाकरिता अनिवार्य असलेल्‍या एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना दि.

८ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

राज्‍य सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्‍यासाठी नोंदणी करुन अर्ज करावे लागते. ही प्रकि्रया सुरू झाली आहे. मात्र, त्‍याची मुदत १ मार्चला संपली. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केले नव्‍हते. त्‍यामुळे या सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत होती. त्‍या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
एमएचटी-सीईटी ही दि. १६ ते ३० एप्रिल या कालाधीत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनाही फायदा

बी.एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमाच्‍या सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची मुदत २९ फेब्रुवारीला संपली होती. त्‍यानंतर आता मुदतवाढ मिळाल्‍याने विद्यार्थ्यांना दि. १५ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.