ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने महावितरण अधिका-यांशी चर्चा

56

मूल:- महावितरण कार्यालयात कृषी पंपाचे अवाजवी बिल आकारणी व मिटर रींडींग न घेता पाठविण्यात येणारे विज बिल या बाबत मूल शहर व ग्रामीण चे कनिष्ठ अभियंता यांचे सोबत यांचे कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालूका शाख मूल च्या वतीने सविस्तर चर्चा करून शेतक-यांना न दुरूस्त मिटर बदलून न मिळणे मिटरचे रींडीग न घेता पाठविण्यात येणारे विज बिल तसेच कुठलाही वापर नसतांनाही बंद स्थितीत असलेल्या कृषी पंपाचे बिल पाठविणे या बाबत सविस्तर चर्चा केली असता ग्राहकांना मिटर बंद असेल तरी तिमाहीची ठराविक रक्कम हि भरावीच लागणार आहे. तसेच ज्या शेतक-यांचे मिटर न दुरूस्त असेल त्यांनी स्वताच्या भरोसावर बाजारातून नविन मिटर खरेदी करून आणल्यास महावितरण ते मिटर बसवून देईल तसेच त्या मिटरची ठरावीक रक्कम शेतक-यांच्या पूढील बिलातून कपात करून दिली जाईल.
तसेच ज्या काळामध्ये पंपाचा वापर नसेल आणि सरासरी बिल आले असेल त्या काळात शेतक-यांनी महावितरण कार्यालयात या बाबत विनंती अर्ज सादर केल्यास चाौकशी करून त्या काळाचे विज बिल दुरूस्ती करून देण्याची महावितरण ने व्यवस्था केली आहे. असे अधिका-यांनी ग्राहक पंचायत मूल शाखेच्या पदाधिका-यांना आश्वस्त केले.
महावितरणच्या अधिाका-यांशी चर्चा करतांना दिपक देशपांडे अध्यक्ष मूल तालूका शाखा मूल यांचे नेतृत्वात परशूराम शेंन्डे,तूळशिराम बांगरे,रमेश डांगरे, व इतर पदाधिकाी उपस्थित होते.
ग्राहक पंचातय महाराष्ट्र या निमित्याने शेतक-यांना आवाहन करत आहे कि, ज्या शेतक-यांचे शेतातील मिटर न दुरूस्त असतील किंवा लावलेच नसतील अश्या शेतक-यांनी महावितरणच्या अधिका-यांशी संपर्क साधून स्वखर्चाने नविन मिटर बसवून घ्यावे. व मिटररीडींग प्रमाणेच बिलाचा भरणा करावा. त्यासाठी महावितरण जवळ मिटर नसल्यास ख्ुल्या बाजारातून आपण ते खरेदी करून बसवू शकणार आहोत असे महावितरणच्या अधिका-यांनी स्पष्ट केलेले आहे.