शुरवी महिला महाविद्यालयात ग्राहक जागृती सप्ताहा निमित्य ग्राहक व महिला दिन साजरा

57

शुरवी महाविद्यालयात ग्राहक जागृती सप्ताहा निमित्य ग्राहक व महिला दिन साजरा
मूल:- येथील शुरवी महिला महाविद्यालय मूल येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल तर्फे महिला ग्राहक जागृती अभियाना अंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मूल मधील प्रसिध्द व्यावसायीक जीवनभाऊ कोंतमवार यांचे अध्यतेखाली व प्राचार्य हर्षा खरासे यांचे प्रमूख उपस्थितीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे ,संघटक तुळशिराम बांगरे,प्रमोद मशाखेत्री,रमेश डांगरे,मुक्तेश्वर खोब्रागडे इत्यादी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना अनेक हक्क दिले आहे मात्र माहितीच्या अभावामुळे ग्राहकांची वेगवेगळया पध्दतीने फसवणूक हेात असते त्यामूळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने सुरू केलेली ही जनजागृती मोहीम महिलांना आणि सर्व सामान्य ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहे. ही संधी आपल्या महाविद्यालयात उपलब्ध करून कायदयाची व ग्राहक अधिकारांची जाणीव करून देण्याचा त्यांचा उपक्रम अभिनंदनीय असून विद्यार्थीनींनी आपल्या घरापर्यंत आणि समाजापर्यंत पोहचविल्यास होणारी फसवणूक सहज टाळता येणे सहज शक्य आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलतांना जिवन कोंतमवार यांनी केले.
प्रमुख अतिथी दीपक देशपांडे यांनी ग्राहक हक्क् माहिती देताना ग्राहकांच्या होणा-या फसवणूकीपासून बचावासाठी पावती मागणे हा ग्राहकांचा मुलभुत अधिकार असून पावतीची मागणी केली गेल्यास होणा-या कुठल्याही फसवणूकी पासून आपण बचाव करू शकतो. असे प्रतिपादन केले.
रमेश डांगरे यांनी ग्राहक या शब्दाची व्यप्ती स्पष्ट करत ग्राहक म्हणून मिळालेल्या अधिकारांची उदाहरणासहीत माहीती दिली.
यावेळी बोलतांना प्रमोद मशाखेत्री यांनी शासनाच्या वतीने देण्यात येणा-या प्रमाणपत्रासाठी लागणा-या आवश्यक कागदपत्रा बाबत माहिती दिली.
तसेच या प्रसंगी बोलतांना मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी कृषीविषयक बि -बियाणे खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी व त्यासाठी पावती व पिशवीसह लागून असलेले प्रमाणपत्र व मुठभर धान्य किंवा खते जपून ठेवल्यास बि बियाणे उगवणीत अडथळा आल्यास त्या विरूध्द दाद मागण्यास सहायकारी ठरेल हि बाब विद्याथ्र्यांनी आपल्या पालकांना समजावून सांगण्याची आवश्कता समजावून सांगीतली.
कार्यक्रमाचे संचालन डाॅ.मिनाक्षी राईचवार यांनी तर ग्राहक गित गायन महाविद्यालयातील विद्यार्थीनिंनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सौरभ तरारे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.