आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम

55

विभाग प्रमुखांना निर्देश

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाचा भर  – उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम

मूल दि. 17 :  भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय विशालकुमार मेश्राम यांनी केले. 

     केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी बल्हारपूर विधानसभा निवडणुक विभाग पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे, असे प्रतिपादन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय विशालकुमार मेश्राम यांनी केले.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत येथे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी मूलचे तहसीलदार मृदुला मोरे, पोंभूर्णाचे तहसीलदार शिवाजी जाधव, निवडणूक नायब तहसीलदार यशवंत पवार, प्रकल्प अधिकारी तथा निवडणूक आचारसंहिता नोडल अधिकारी निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

अध्यक्ष/सचिव पत्रकार संघ तालुका मुल/ पोंभूर्णा ,प्रिटींग प्रेस धारक तालुका मूल/पोभूर्णा उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आचारसंचीतेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबाबत सभा दिनांक 17/03/2024 रोजी दुपारी 4 वाजता झाली.

मतदार जनजागृतीकरीता स्वीप योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे,
बल्हारपूर विधानसभा मतदार संघात एकूण ३ लक्ष ९७ हजार ८०० मतदार : यात १ लक्ष ५३ हजार ९५६ पुरुष मतदार, १ लक्ष ४६ हजार १९० स्त्री मतदार आणि इतर ३ जणांचा समावेश आहे. विधानसभा क्षेत्रात एकूण मतदान केंद्रांची संख्या ३५७ आहेत.
85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले २२४६ मतदार आहेत. तसेच मतदार संघात एकूण १८४२ दिव्यांग मतदार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारास गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारास 12 डी नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक– 2024 करीता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07172- 271617 आहे. सोशल मिडीया नियंत्रण व तक्रारीकरीता पोलिस विभागातर्फे 8888511911 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून 24 बाय 7 कार्यरत राहणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रार निवारण / मदत कक्ष, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण / मदत कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1950 असून आदर्श आचार संहिता कक्षाचा क्रमांक 8788510061 आहे. तसेच सी-व्हिजील / ई.एस.एम.एस. या ॲप वरही तक्रार नोंदविता येणार आहे.