मूल@ अचानक लागली आग ! काळी पिवळी वाहन जळून खाक

61

काळी पिवळी वाहन जळून खाक
अचानक लागली आग
मूल :- प्रवाश्यांची फेरी मारून आलेल्या एका काळी पिवळी प्रवासी वाहनाला अचानक आग लागली.त्यात ती पूर्णतः जळून खाक झाली.ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान येथे घडली. प्रवासी वाहन येथिल चिलके यांच्या मालकीची होती. ग्रामिण भागातील प्रवासांच्या सेवेसाठी काळी पिवळी वाहन चालविले जाते.चिलके यांच्या मालकीच्या असलेल्या वाहन चालकाने प्रवासी फेरी मारून आणल्यानंतर मूल येथील गांधी चौकात असलेल्या जुने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वाहन उभे केले. त्यांनतर काही वेळातच वाहनाने पेट घेतला.ठेवलेल्या जागेवरून वाहन काही अंतरावर मागे सरकून एका झाडाला धडकले.तिथेच त्या वाहनाने पूर्णतः पेट घेतला.त्यात ती जळून खाक झाली.अग्नीशामन यंत्र वाहन येईपर्यंत काळी पिवळी पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. अग्नीशामन यंत्र वाहनाने आग आटोक्यात आणली.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.आग लागलेल्या काही ठिकाणांपासून फुटपाथवरील दुकाने होती.तसेच विदयुत खांब जवळच होते.परंतु आग आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.यावेळी पोलिसांनी बंदोबस्त लावून गर्दी आटोक्यात आणली.