आधार प्रमाणीकरणाला शेतक-यांचा उत्तम प्रतिसाद

80

माहे एप्रिल 2023 रोजी आलेल्या अतिवृष्ठी व पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना शेतपिक नुकसानीचा लाभ मिळविण्याकरीता आज ईकेव्हासी करून देण्यात आलेले आहे. मुल तालुक्यातील उर्वरीत शेतक-यांनी आपली आधार प्रमाणीकरण करण्यात यावे. माहे एप्रिल 2023 रोजी आलेल्या अवकाळी पाउुस व गारपीटीमूळे नुकसान ग्रस्त खातेदाराचे हेक्टर आर शेतपिकाचे नुकसान झालेले होते. त्यापैकी काही खातेदार यांना अनुदान प्राप्रूत झालेले आहे. परंतू माहे एप्रिल मधील खातेदार यांचे ईकेव्हासी पेंडीग असल्यामूळे प्रर्कीया पूर्ण करून नुकसान गस्त शेतकरी अनुदान पासून वंचीत राहणार नाही याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा आणि विविध योजनांचा लाभही वेळेवर मिळावा, यासाठीही यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळेच विविध योजनांचा लाभ  नागरिकांना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज दिनांक 03 एप्रिल 2024 ला 90 शेतक-यांचा आधार प्रमाणीकरण प्रेरणा आॅनलाईन् सेंन्टर येथे करून देण्यात आले आधार प्रामणीकरण ची पावती सुध्दा देण्यात आलेली आहे. 

 १. आधार पडताळणी संदेश यशस्वी होईपर्यंत शेतकरी वापरकर्त्याला त्याच्या अगणित वेळेस बोटांचे ठसे देण्याची परवानगी द्यावी.२. शेतकऱ्याचा योग्य VK क्रमांक प्रविष्ट केला असल्याची खात्री करा आणि दुसर्‍या बोटाने पुन्हा प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करा; बोट योग्यरित्या ठेवले आहे याची खात्री करा; बोटे स्वच्छ आहेत याची खात्री करा; बोट खूप कोरडे नाही याची खात्री करा; फिंगरप्रिंट स्कॅनर स्वच्छ असल्याची खात्री करा.३. फिंगर प्रिंट नीट दिलेली नाही, स्कॅनरमध्ये थोडी धूळ साचली आहे, बोटे ओली झाली आहेत, बोटाची स्थिती योग्य नाही, अशा वेळेस शेतकऱ्याला साबणाने हात धुवा आणि पावडर किंवा व्हॅसलीन लावन्यास सांगावे.

४ . जर कोणताही शेतकरी बायोमेट्रिकद्वारे पडताळणी करू शकत नसेल तर कृपया OTP द्वारे eKYC पडताळणी करून पहा.
आधार प्रमाणीकरण – नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत

सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांस सूचित करण्यात येत आहे कि नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत साठी शेतकरी यांचे आधार प्रमाणीकरण करण्या करीत आपल्या पोर्टल वरून नवीन सर्व्हिस सुरु करण्यात आलेली आहे.माहे  अतिवृष्टीमुळे तसेच उध्द्ववलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेत पिकांचे व शेत जमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी संगणकीय प्रणालीवरून देण्यात येणार आहे , पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सूचनाफलक तहसील ऑफिस , ग्रामपंचायत यांच्या बाहेर प्रसिद्ध केल्या जातील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांचे eKYC आपण आपल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या लॉगिन मधून मोफत करून देणार आहोत . सूचना :- अशा शेतकऱ्यांकडून eKYC करण्याचे शुल्क आकारू नये . आपण आपल्या लॉगिन मधून केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक eKYC चे शुल्क आपणास Mahait द्वारे देण्यात येईल . अधिक माहिती व टेक्निकल मद्दती साठी आपण हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता

सध्या पोर्टल वर Mantra MFS100 Biometric . Fingerprint Scanner डिव्हाईस eKYC साठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे .”