दैनंदिन व्यवहारात वापर वाढला@आताही अंगठ्याचीच चलती

66

ग्रामीण भागात समस्या कायम
जुन्या काळात सरकारी कामात, खरेदी-विक्री कामात, देवाणघेवाणच्या कामात तो व्यक्ती निरक्षर असेल तर त्यांच्याकडून अंगठा लावून काम पूर्ण करून घेतले जात होते. त्याकाळी अशा कामासाठी अंगठ्याचा वापर हमखास होत असे, त्यावेळी निरक्षरांना हाच पर्याय होता. मात्र, आता आधुनिक काळात पूर्वीप्रमाणे स्वाक्षरीसाठी अंगठा वापरला जात नसला तरी मात्र पक्का पुरावा, खात्री होण्यासाठी थम्ब घेण्याकरिता व्यक्तीच्या अंगठ्याचा वापर केला जात आहे.
आजघडीला अंगठ्याचे महत्त्व वाढले आहे. आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात अंगठ्याचा दररोज दैनंदिन व्यवहारात वापर वाढला आहे. मराठीतील अंगठा म्हणण्यापेक्षा इंग्रजीतील ‘थम्ब’ला मान अधिक असल्यामुळे आजचा तंत्रज्ञान युगातील पिढीला मात्र अंगठे बहाद्दर म्हणता येणार नाही. आजच्या कुटुंबातील परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी गरीब व्यक्तीसुद्धा १०वी व १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या आहेत. पूर्वी निरक्षरांसाठी अंगठे बहाद्दर नाव प्रसिद्धच होते. मात्र आतादेखील अनेक शासकीय कामामध्ये थम्ब लावले जात आहेत.
दर पाच वर्षांनी प्रत्येक नागरिकाने आपले आधारअपडेट करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा कामात अडचणी येणार नाहीत.

कुठे-कुठे केला जातो थम्बचा वापर
■ शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी,शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी,,महाडीबीटी योजनेसाठी ,शेतक-यांचया विविध योजनेसाठी आंगठाचा वापर करण्यात येत असते.
तसेच बँकेतून, खासगी दुकानातून, पोस्ट ऑफिसमधून पैसे काढण्यापासून तर शाळेत काम करणारे कर्मचारी, दवाखाना, कार्यालयातील कर्मचारी,
अधिकारी हजेरीसाठी थम्ब मशीनचा वापर करीत आहेत. आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी व संपूर्ण नावात, जन्म दिनांक दुरुस्तीमध्ये थम्ब मारावे लागते.
अशा प्रकारे येत आहेत अडचणी■ काही शेतकऱ्यांना अनुदाना संबंधी ई-केवायसी करण्यासाठी थम्ब देतेवेळी अडचणी येत आहेत. कारण, कष्टकरी शेतकरी शेतात राबराब राबत असतात. शेतीकामांमुळे अंगठ्याला भेगा पडलेल्या आहेत. यामुळे मशीनवर थम्ब लवकर मॅच होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याने आधार क्रमांकाला मोबाइल नंबर अपडेट करून घ्यावा. जेणेकरून ई-केवायसी करतेवेळी अंगठ्याला भेगा पडल्यामुळे थम्ब मॅच होत नसेल तर आधार क्रमांकाशी दिलेल्या नंबरवर ओटीपी येईल व ई-केवायसी होईल.