ई-केवायसी 3 दिवसापासून होईना@सेतू केंद्रावर महाऑनलाइन पोर्टलकरिता शेतकऱ्यांची हजेरी

77

गतवर्षीच्या माहे नोंव्हेबर 2023 मधील प्रलंबीत यादी ची नुकसान भरपाई मिळणार पण, ई-केवायसी करावी लागणार गतवर्षी अवकाळीने कहर केला होता. मूल तालुक्यात जोरदार चक्रीवादळासह गारपीट झाली होती. त्यात हाता- तोंडाशी आलेला हंगाम निसर्गाने मातीमोल केला होता. त्याची दखल कृषी विभागाने घेत पंचनामे पार पाडले होते.  खातेदारांना वाटप करण्याकरिता ई-केवायसी गरजेची आहे. तहसीलदार मृदुला मोरे मूल यांनी लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान केले आहे.
थेट खातेदाराला त्याच्या खात्यावर अनुदानाची रक्कम मिळणार आहे. तत्पूर्वी, लाभार्थ्यांना सेतू केंद्रातून तालुकास्तरावर तलाठी कार्यालयामार्फत नुकसान भरपाई संबंधाने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ते पत्र सेतू केंद्रातून महाऑनलाइन पोर्टलवर ई-केवायसी करून सोबत आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स संबंधित तलाठी कार्यालयात देणे गरजेचे आहे.

महसूल विभागामार्फत प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी पत्र पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. लाभार्थ्यांनी तत्परतेने ई- केवायसी व इतर गरजेची कागदपत्रे जमा करावी. गतवर्षी मूल व परिसरात सायंकाळी  दरम्यान तुफान चक्रीवादळ, गारपीट झाली. शेतपिकासह राहत्या घरांचे व वीज विभागाचे खूप मोठे नुकसान झाले होते. विजेचे हजारो खांब तुटून पडले. शेत पीक मातीमोल ठरले. राहत्या घराचे छप्पर उडाले. कच्चे घर राहण्यायोग्य राहिले नव्हते. लोकप्रतिनिधी व तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी थेट नुकसानीचा पंचनामा केला होता.
सेतू केंद्रावर गर्दी वाढली
सेतू केंद्रावर महाऑनलाइन पोर्टलकरिता शेतकऱ्यांची हजेरी लागत आहे. मात्र, नोंदणी दरम्यान महाऑनलाइन पोर्टलला जागा मिळत नाही. दिवसभर पोर्टलव्यस्त जात असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.सध्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे दोन माध्यम आहेत. परंतु हे दोन्ही माध्यम गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने शेतकरी उन्हाताना चकरा मारत आहेत. तरी शासनाने या दोन माध्यमातून एक माध्यम सुरू ठेवून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याच्या कामाला गती द्यावी तेव्हा,जिल्हास्तरावरून पोर्टलला गती देत  शेतकऱ्यां@च्या कामांना सहकार्य करणाऱ्याची मागणी होत आहे.