स्टेट बॅंक इंडीया च्या वतीने मुल शहरात ग्राहक सेवा केंन्द्र सुरू

79

गुडी पाडव्याच्या औचित्य साधून केंद्राच्या उदघाटन प्रसंगी मॅनेजर देशमुख यांनी सर्व सामान्य ग्राहकांना सुटयांच्या कालावधी सह बॅंकिग वेळे व्यतिरिक्त ही बॅंकेच्या सेवेचा लाभ मिळणार असून सर्वसामान्यांना बचत खाते उघडणे, पेन्शन धारकांना पेन्शनचे पैसे काढणे,पैसे हस्तांतर करणे, विद्याथ्र्यांना बचत खाते उघडण्यापासून ते शिष्यवृत्तीचे पैशाचे व्यवहार,बचत गटातील अंतर्गत व्यवहार पैसे काढणे अथवा भरणे करणे,थोडक्यात पैशाचे छोटया प्रमाणातील सर्व व्यवहार या ग्राहक सेवा कंद्रा मार्फत होणार असल्याने ग्राहकांना निश्चितच त्याचा लाभ होउुन त्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

या सेवा केंद्रामार्फत केद्र शासनाच्या विविध साामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळणे आणि कामी बॅंकेने पुढाकार घेतला असून केंद्रामार्फत अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, या योजनांचाही लाभ घेवून स्वताः बरोबर आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाच्या दुष्टीने या सर्व योजनांचा लाभ घ्यावा,असे देशमूख यांनी स्टेट आॅफ इंडीया च्या ग्राहक सेवा केंद्राच्या उदघाटन प्रसंगी सांगितले
सदर कार्यक्रमास बॅक मॅनेजर देशमूख साहेब, बॅंकेचे ग्राहक तसेच दिपक देशपांडे पत्रकार,नितीन येरोजवार संचालक सेक्सस काॅम्यूटर, आधार संचालक पराग खोब्रागडे, आरती पांडे,आरती बंडीवार,ज्योती बाबरे मेश्राम,आॅनलाईनचे वैद्य, प्रगती काॅम्यूटचे संचालीका वैशाली मशाखेत्री ग्राहक बॅंकचे संचालक प्रमोद मशाखेत्री रागीनी देवगडे,आॅपरेटर मोनी गोंगले,राखी मंडलवार,विवेक मुनगुलवार तसेच ज्येष्ठ नागरीक विद्यार्थी बहूसूख्येने उपस्थित होते.