मूल, ता. ९ : निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृहमतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे.त्यानुसार बल्लारपूर विधानसभा अंतर्गत एकूण २५३ नागरिकांनी गृह मतदानाची इच्छा दर्शविली आहे. त्यानुसार दहा पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत बल्लारपूर विधानसभा मतदार संघामधील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांकरिता ८ ते ११ एप्रिल या चार दिवसांपर्यंत गृह मतदानाकरिता एकूण दहा पथके रवाना करण्यात आली आहे. त्याची सुरुवात सोमवारी मूल येथून करण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून
वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमांच्या जनजागृती करीत आहे.
माध्यमातून मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर या विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षावरील ज्येष्ठ मतदार १९७ तर दिव्यांग मतदार ५६ असे एकूण २५३ मतदारांना गृह मतदानाची सोय घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे करून
देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसी पोस्टल बॅलेट पेपरद्वारा मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. निवडणुकीच्या दिवशीही कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी इडीसीद्वारा मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.