चंद्रपूर, दि. 16 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये आयोजित ‘समता पंधरवडा निमित्त सत्र 2023-24 करीता 12 विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 11 वी व 12 वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणत्र पडताळणी केलेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी आपला रितसर, परिपूर्ण भरलेला अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी करीता सादर करावा. तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास सीईटी व्दारे 2024-25 मध्ये प्रवेश घेऊ इच्छीत असणा-या (तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाला प्रवेशित असणारे ज्यांना अभियांत्रीकी अभ्यासक्रमाचे थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे.) विद्यार्थ्यांनी आपला रितसर भरलेला अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी करीता सादर करावा.
सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 11 वी व 12 वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणत्र पडताळणी करीता अर्ज सादर केलेले आहे. परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांचे प्रकरणे त्रुटी मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्रुटी पुर्ततेकरीता कार्यालयास संपर्क साधावा व लवकरात लवकर त्रुटींची पुर्तता करून घ्यावे, असे समिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम यांनी कळविले आहे.