क्रांतीसुर्य महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा

106

मुल: ज्या महापुरुषांच्या विचारानेच देशाची लोकशाही टिकली आहे अशाच महात्म्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. २१ एप्रिल २०२४ रोजी यवतमाळ येथे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यांची शाई फेकून विटंबना केली. त्याचा शोध घेऊन त्या समाज कंटकांना अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी मूल यांचेकडे समाज संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
माळी महासंघ,समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, सावित्रीबाई फुले विकास संस्था, समजोत्थाण मंडळ, महिला गट, ओबीसी व बहुजन समाजाच्या वतीने गांधी चौक मुल येथे दिनांक 25 एप्रिल ला सकाळी 11 वाजता निषेध करुन निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी प्राचार्य बंडू गुरनुले, डॉ.राकेश गावतुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव गुरु गुरनुले, डॉ. पद्माकर लेंनगुरे, माजी न.प.उपाध्यक्ष चंदू चटारे,माजी न. प.उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले, भाजपा युवा अध्यक्ष राकेश ठाकरे, प्रा.सुधीर नागोशे, दिपक वाढई, समता परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतूरे, केमदेव मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते हसन वाढई,सरपंच नितीन गुरनूले, विवेक मांदाडे,ओमदेव मोहूर्ले, राकेश मोहूर्ले, आनंद गोंगले, अरुण ढोले, सचिन पुल्लावार, चित्तरंजन वाढई, बाळकृष्ण निकोडे, बालाजी लेंनगूरे, रवी खोब्रागडे, मंगेश शेंडे, सचिन आंबेकर, निखिल वाढई, सत्यवान मोहूर्ले, सुनील कावळे, देवराव गुरनुले,राकेश पुनावार, रेखा चौधरी, शामला बेलसरे, पपिता मांदाडे, जयश्री कावळे, सीमा लोनबले, प्रेमिला शेंडे,प्रदीप वाढई, परशुराम शेंडे, रामदास गुरनुले, श्रीरंग नागोशे, नामदेव वाढई, उमेश ढोले यांचेसह अनेक बहुजन समाज बांधव उपस्थित होते.