मूल तालुक्यातील १११ गावांपैकी ५३ रिठी गावात सर्वेक्षण@गावकऱ्यांना मिळणार मिळकत पत्रिका व नकाशे

76

खूशखबर ! : ड्रोन कॅमेऱ्याने झाले गावठाण जमिनीचे सर्वेक्षण
१५ हजार गावकऱ्यांना मिळणार मिळकत पत्रिका व नकाशे !
मूल गावात असलेल्या गावठाण जमिनीचे मिळकत पत्रिका व स्वतंत्र नकाशा नसल्याने बँकेचे कर्ज, कर आकारणी व बांधकाम परवानगीसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून व जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या सहकार्याने गावातील गावठाण जमिनीचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मूल तालुक्यातील गावात करण्यात आले. यात जवळपास १५ हजार गावकऱ्यांना जमिनीची मिळकत पत्रिका व नकाशा दिला जाणार आहे.
त्यामुळे त्यांना जमिनींचे स्वामित्व हक्क मिळणार आहे. यामुळे अनेकांना विविध लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन प्रयोग केले जात आहे. ग्रामीण भागातील गावठाणात वसलेल्या घराच्या जागेची मोजणी करण्यासाठी यापूर्वी परंपरागत पद्धतीचा वापर केला जात होता. त्यामुळे स्वतंत्र मिळकत पत्रिका व नकाशा मिळत नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. हे हेरून ग्रामविकास मंत्रालय मुंबई, जमाबंदी आयुक्त पुणे व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मूल तालुक्यातील १११ गावांपैकी ५३ रिठी गावात सर्वेक्षण
करण्यात आले. मालमत्तांचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक मिळणार असल्याने रेखांकन व मूल्यांकन करणे सोयीचे होणार आहे. यात जमीन मालकाला स्वतंत्र स्वामित्व प्राप्त होणार असून मिळकत पत्रिका व नकाशा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अतिक्रमणाला
बसेल चाप
या सर्वेक्षणामुळे शासनाच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण होऊन अतिक्रमणाला चाप बसणार आहे. गावातील रस्ते, नाल्या, खुल्या जागा यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखण्यास वाव मिळणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या नागरी हक्काचे संवर्धन होण्यास मदत मिळणार आहे.
ग्रामीण भागात गावठाण असलेल्या जमिनीचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेयाच्या साहाय्याने मूल तालुक्यातील ५३ गावांत करण्यात आले. या सर्वेक्षण कार्यक्रमामुळे गावातील जमीन मालकाला स्वतंत्र स्वामित्व हक्क मिळणार आहे. तसेच मिळकत पत्रिका व नकाशा मिळणार असून बँकेचे कर्ज व इतर शासकीय कामासाठी उपयोग होणार आहे. मूल तालुक्यात जवळपास १५ हजार गावकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे.
-सुधीर लव्हाळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूल.