माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चे शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदीपक यश

84

मूल प्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 18 फेब्रुवारी 2024 मध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल काल जाहीर करण्यात आला. त्यात माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथील विद्यार्थ्यांनी यामधे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विद्यालयातील एकूण २९ विद्यार्थी व विद्यार्थिनी पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5 व वर्ग 8 वी साठी पात्र झाले आहेत.
यात प्रामुख्याने वर्ग 5 वी मधील विद्यार्थी* आर्या यशवंत शेट्टे, परी प्रभाकर मांदाडे, रेणू संदिप ठाकुरवार, आरोही अविनाश निमगडे, वेदिती किशोर भोयर तर वर्ग 8 वी मधील विद्यार्थी अक्षरा गेडाम, आरुषी नन्नेवार, आयुषी चुदरी , हिंदवी पिंपळे, खुशी खोब्रागडे, लिप्सा वाधवानी, मृणाली सावसाकडे, नावेद अन्सारी, नमोश्री गजभिये, पलक कोसरे, नयन घोटेकर, परितोष कुंटावार, साहिल येरमे, समिक्षा ठाकुरवार, सायली येनुरकर , श्रद्धा शनगरवार, श्रावणी गोहणे , श्रेया मेश्राम , श्रेया गोंगले , तन्मय जिडगलवार, तुषार आंबटकर, तन्वी भुरसे , वेदांग अनंतुलवार , पुर्वा मोहुर्ले या विद्यार्थ्यांनच समावेश आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थी,विद्यार्थ्यांनीनी त्यांच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक सचिन सर , अशपाक सर , कवाडकर सर , सुनीता मॅडम, सौरभ सर , निलेश सर , सुष्मा मॅडम, मोहिनी
मॅडम, रेहाना मॅडम यांना दिले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष झाडे सर, संस्थेचे सदस्य शैलेश झाडे , शाळेच्या प्राचार्या कुमारी रिमा कांबळे यांनी कौतुक केले आहे. आज सर्व विद्यार्थ्याचे पालकांसमवेत शाळेतर्फे अभिनंदन करून सत्कार करण्यात आली असून या उज्वल यशाच्या परंपरेबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.