मुल तालुक्यातील पडझरी@तेंदुपान तोडण्यासाठी गेलेल्या आशिषचा वाघाने घेतला बळी

62

मूल – मुल तालुक्यातील पडझरी समोर रत्नापुर जंगलातील वनपरिक्षेत्र वनविभाग
मुल अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक ३२४ दिनांक ९/५/२०२४ रोजी सकाळी ६-३० वाजता रत्नापूर येथील चार ते पाच शेतकरी व शेतमजूर तेंदूपत्ता तोडणी करीता जंगलात गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
तेंदूपत्ता तोडणीचे काम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना दुसरे मजुरीचे कोणतेही काम नसल्याने पोटाच्या भाकरीसाठी आशिष सुरेश सोनुले वय (३४) वर्ष हा गावातील इतर चार व्यक्तीमिळून तेंदूपत्ता तोडणीसाठी गेले असता जंगलात आत दूरपर्यंत गेल्याने झाडाच्या आड बसून असलेल्या पट्टेदार वाघाने त्यातील आशिष सुरेश सोनुले यांचेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे रत्नापूर व पडझरी परिक्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील जंगल व्याप्त ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरी व शेतमजुरांना दुसरे कोणतेही काम नसल्यामुळे कुटुंबीयांना पोटाची भाकर, शिक्षण, लग्न इत्यादी अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावत असतात. आणि नुकतेच मे महिना सुरु होतात शासनाने तेंदूपत्ता तोडणीला सुरुवात केली आहे. तेंदूपत्ता तोडणीची मजुरीही मजुरांना व शेतकऱ्यांना परवडण्यासारखी असते. यासाठी जंगल व्याप्त गावातील मजुरांना पैशासाठी उन्हाळी सिजन करुन घेणे भाग पडते कारण दुसरे उत्पन्नाचे व मजुरीचे कोणतेही साधन नाही.
चालू वर्षातील वाघाने ठार केल्याची मुल तालुक्यातील पहिली घटना आहे. मागील वर्षी तालुक्यात एकूण १७ घटना घडल्या आहेत. त्यात रत्नापूरला लागूनच असलेल्या पडझरी जंगलात वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जमाव करुन काँग्रेसचे नेते व सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात वनविभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी रेटून धरली व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना एक तास घेराव सुद्धा केला होता.
य़ामुळे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक विश्राम गृह मुल येथे तात्काळ बैठक घेऊन ग्रामस्थांचे समाधान केले होते. आज ठार केलेल्या आशिष सुरेश सोनुले यांना पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यावर त्या कुटुंबीयांचा आधारच हिरवल्या जात असते. अशा प्रसंगी शासनाने अशा निराधार झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व वन्यप्राण्यांची दहशत वाढल्याने गावक-यांकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
रत्नापूर येथील घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक पाकेवार, वनरक्षक एस.जी. पाळडे, वनरक्षक ज्योती दवरेवार यांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाला शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विक्रम गुरनुले व काही ग्रामस्थ हजार होते. तेव्हाच वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांनाजिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सातवा बळीचंद्रपुर