कृषी महाविद्यालय मूल.(सोमनाथ) येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न

71

कृषि महाविद्यालय मूल येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक ६ व ७ मे रोजी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, वन प्रशासन विकास संशोधन व व्यवस्थान प्रभोदिनी चंद्रपूर, श्रद्धेय श्री अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन, विसापूर व विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, कृषि विज्ञान केंद्र व कृषि संशोधन केंद्र ( फळे व भाजीपाला ), कृषि महाविद्यालय सोनापूर, गडचिरोली येथे सहलीचे आयोजन केले होते.

बांबू संशोधन केंद्र चिचपल्ली या संशोधन केंद्रात बांबुच्या ७८ जातींचे प्रात्यक्षिक आहेत. येथील रोपवाटिके मध्ये स्थानिक प्रजाती व इतर राज्यातून आणलेल्या बियाणांची लागवड करून त्याचे रोपे तयार करून ते विक्रीस उपलब्ध केले जातात. बांबु पासून दागदागिने, तबला, डायरी, खेळणी इत्यादी वस्तू तयार करून व विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. तसेच प्रत्यक्षात बांबू पासून वस्तू कश्या तयार करतात या बाबतचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. त्यानंतर शेतकऱ्यासाठी बांबू लागवडी साठी विविध योजना या बद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. बांबू संशोधन  केंद्राच्या कार्यशाळेची भेट यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री. घ. मेश्राम , श्री. वि. कोसनकर, श्रीमती वर्षा राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. दिनांक ०६ मे रोजी दुपारच्या सत्रात श्रद्धेय श्री अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन ,विसापूर येथे सायन्स सेन्टर , जैवविविधता सेन्टर मध्ये विविध तृणधान्य पिकाचे वाण, फुलपाखरू उद्यान, बोन्साय उद्यान, गुलाब उद्यान, विज्ञान प्रदर्शनी, म्युझियम मध्ये विविध खडकाचे प्रकार तसेच झाडांच्या जुन्या प्रजाती, अत्याधुनिक मत्स्यालय मध्ये विविध प्रकारच्या मत्स्य जाती, विविध झाडांचे प्रकल्प पाहण्याची संधी विध्यार्थाना मिळाली.

दिनांक ७ मे रोजी सकाळी ८ वाजता विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे भेट आयोजित करण्यात आली हे संशोधन केंद्र इंग्रजकालीन असून याची स्थापना १९११ साली झाली . कृषी संशोधन केंद्राचे क्षेत्रफळ १२६.६८ हेक्टर असून यातील ५० हेक्टर जमीन लागवडी खालील आहे . येथील संशोधन केंद्रात ८८ धानाच्या जातीचे संगोपन केले आहे. धान पिकांच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाणे तयार केलेल्या विविध जाती प्रजाती मध्ये सिंदेवाही संशोधन केंद्राचा मोलाचा वाटा आहे. या संशोधन केंद्राने १५ धानाच्या जाती विकसित केलेल्या आहे. हे केंद्र स्वतंत्र पूर्वीचे आहे व हि कृषि वेदशाळे मार्फत अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यांची माहिती शेतकऱ्यांना तसेच देशभरातील विविध वेधशाळेला पुरवली जाते. तसेच उन्हाळी मूग पिकाच्या प्रक्षेत्रावरील भेटी दरम्यान मूंग पिकाची सविस्तर माहिती विद्यार्थांनी जाणून घेतली.

कृषि अवजारे व जैविक खते ज्यामध्ये अझोटोबॅक्टर, पीसबी, शेतकऱ्यांना कमी दरा मध्ये पुरवली जातात. सदर संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी संजिवनी असून याचा शेतकऱ्यांना पुरेपूर लाभ होतो इत्यादी विषयावर डॉ. जि. आर . श्यामकुवार, डॉ. एम. आर. वांढरे, श्री. ए. ए. नागदेवे, श्री. जि. एस. दांदळे, श्री. एल. एन.डोंगरवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही ची स्थापना २००४ साली झाली. या कृषि विज्ञान केंद्रात दरवर्षी शेतकऱ्यांसाठी ४२० प्रथम रेषीय प्रात्यक्षिक घेतले जातात. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध शेती सलंग्न प्रशिक्षण घेतले जातात. धान पिकाच्या प्रजाती विकसित करण्यामध्ये कृषि विज्ञान केंद्राचा सुद्धा मोठा वाटा आहे. तसेच इथे अझोला उत्पादन, कोंबडी पालन, गांडूळखत इत्यादी विविध विषयावर प्रकल्प राबविले जातात याबद्दल सविस्तर माहिती डॉ. विनोद नागदेवते आणि श्री. विजय सिडाम यांनी दिली. दुपारच्या सत्रात कृषि विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथे भेट देण्यात आली. या कृषि विज्ञान केंद्रात सुद्धा धानाचे ३२७ शेतकऱ्यांसाठी प्रथम रेषीय प्रात्यक्षिके घेतली जातात तसेच सोयाबीन पिकावर २०० प्रथम रेषीय प्रात्यक्षिक घेतले जातात. तसेच या कृषि विज्ञान केंद्रात विविध कृषि संलग्न प्रशिक्षणही घेतले जातात. कृषि विज्ञान केंद्र सोनापूर येथे फळ रोप वाटिका असून ज्यामध्ये विविध फळ झाडांची रोपे उपलब्ध केली जातात. सद्यस्तिथीत या रोपवाटिकेत आंबा, चिकू, पेरू, काजु, ड्रॅगनफ्रूट इत्यादी फळझाडांची रोपे उपलब्ध आहेत. कृषि विज्ञान केंद्र सोनापूर येथे गायींसाठी मुक्त संचार गोठ्याचे नमुने व विविध प्रजातींच्या गायी उपलब्ध असून याची माहिती आदिवासी शेतकऱ्यांना पोहचण्यात या कृषि विज्ञान केंद्राचा मोलाचा वाटा आहे. या कृषि विज्ञान केंद्रात स्वयंचलित कृषि वेधशाळा असून ती वेधशाळा आठवड्याला सादर हवामानाची माहिती IMD तसेच देशातील विविध वेधशाळेला पोहचवते कृषि विज्ञान केंद्र सोनापूर येथील प्रीतम चिरडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी संशोधन केंद्र सोनापूर गडचिरोली येथील रोपवाटिका व संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्राला भेट देण्यात आली. ज्यामध्ये फळ झाडांच्या विविध जातींचे रोपे व त्यांच्या कलम करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या. या संशोधन केंद्रात मल्चिंग व वांगी लाऊन त्याचा होणाऱ्या फायद्याचे संशोधन केले जात आहे. या संशोधन केंद्रात डॉ. युवराज खोब्रागडे यांनी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. सहलीच्या अंतिम टप्यात विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालय सोनापूर, गडचिरोली येथे भेट दिली. त्यावेळी डॉ. माया राऊत सहयोगी अधिष्ठाता, यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. त्यानंतर श्री वेंकटेश्वरा तांदूळ गिरणीला भेट दिली. या गिरणीचे एकून क्षेत्रफळ २.७५ हे. असून हि गिरणी उभारण्यासाठी जवळपास आलेला खर्च हा ४.७१ कोटी एवढा आहे. याला गिरणी उभारणीसाठी शासनाकडून १.० कोटी रुपये अनुदान मिळाले. या गिरणी द्वारे १ क्विंटल मालाला सुमारे २०० रु. एवढा खर्च लागतो. गिरणी मालक यांनी धान खरेदी, उत्पादन प्रक्रिया, ड्रायर, हुल्लिंग प्रक्रिया, रंग वर्गीकरण, पॅकिंग व तांदूळ कसा व कुठे विकला जातो या बद्दल संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. या भेटीचा प्रामुख्याने उद्देश म्हणजे कृषि शिक्षणा नंतर विद्यार्थ्यांना मध्ये कृषी उद्योगा करीता कल निर्माण करणे हा होय.
या शैक्षणिक सहलीचे आयोजन कृषि महाविद्यालय, मूल आदरणीय सहयोगी अधिष्ठाता डॉ . विष्णुकांत टेकाळे कृषी महाविद्यालय ,मूल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच शैक्षणिक सहलीचे आयोजन प्रा. देवानंद कुसुंबे यांनी केले व प्रा. मोहिनी पुनसे, डॉ . अक्षय इंगोले व डॉ . गितांशू डिंकवार यांनी सहलीसाठी मोलाचे सहकार्य केले.