गौरवास्पद@चामोर्शीच्या महिलेने गमावलेले पर्स व वस्तू सावलीच्या महिलांनी स्वयंप्रेरणेने परत

78

मूलच्या बसस्थानकावर चामोर्शीच्या महिलेने गमावलेले धन सावलीच्या महिलांनी स्वयंप्रेरणेने परत दिले.

गौरवास्पद कामगिरी.

सावली येथील सौ. किर्ती योगेश्वर शेंडे व सौ. कुंदा जगदीश लेनगुरे या दोघीजणी मूल बसस्थानकावर सावलीच्या बसची वाट पाहत असतांना त्यांना एक बेवारस पर्स मिळाली. पर्स कुणाची आहे म्हणून चार चौघांना विचारणा केली मात्र सावली ची बस लागल्याने पर्स घेऊन या दोघीजणी गावाकडे परत येत असतांना त्यांनी पर्स उघडली तर त्यात ३ तोळे सोने,मोबाईल व ३५०० ₹. दिसले, आणि त्यांना धक्का बसला.त्यामुळे या दोन्ही महिलांनी बस मधूनच फोन वर सावली येथील शांतता कमिटीचे सदस्य तथा माजी सरपंच अतुल लेनगुरे यांना माहिती दिली व घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर अतुल लेनगुरे यांनी सावली चे ठाणेदार राजगुरू यांना माहिती दिली व कुणाची असेल किंवा तक्रार आल्यास त्वरित कळवा असे सांगितले. त्यानंतर १५ मिनिटातच मूल पोलीसात पर्स हरविल्याची माहिती आली आणि त्यांनी त्वरित सावली ला आलेल्या वस्तूची ओळख परेड झाल्यावर ती पर्स व वस्तू सौ.सोनाली गणेश जम्पलवार मु. भेंडाळा ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांची असल्याचे निष्पन्न झाले.त्यात ३ तोळे सोने ,मोबाईल, ३५०० रु असा एकूण दोन लाखाहून अधिकचा माल परत करण्यात आला.यावेळी जंपलवार यांनी या दोन्ही महिलांचे आभार मानले.तसेच त्यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले. सावली चे ठाणेदार राजगुरु यांनी या दोन्ही महिलांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले व अभिनंदन केले.