ई चावडीच्या पूर्णत्वासाठी तलाठी लागले कामाला !

36

मूल : ई चावडी मध्ये मागणी निश्चीत न करताच वसुली केल्या
जात असल्याचा प्रकार लक्षात आल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील संपुर्ण तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांना धारेवर धरले आहे. ई चावडी अंतर्गत संपर्ण काम पुर्ण केल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही, असे तोंडी निर्देश दिल्याने जिल्हयातील युध्दपातळीवर कामाला लागले आहेत. महसुल विभागाच्या नोंदी अद्यावत व अचुक करण्यासाठी शासनाने ई चावडी प्रणाली अंमलात आणली.
ਰਲਾਠੀ
सदर प्रणाली मध्यें प्रत्येक गावांतील महसुली नोंदीची माहिती संगणकीकृत करण्यांत येणार असल्याने प्रत्येक नागरीकाला आवश्यक असलेली नोंदीची माहिती घरबसल्या मिळणार आहे. यामूळे नागरीकांच्या वेळ आणि पैश्याची बचत होणार आहे. नागरीकांच्या हिताची ही बाब डोळयासमोर ठेवून शासनाने ई चावडी प्रणाली अंमलात आणुन सर्व तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांना तलाठी दप्तरातील गांव नमुने १ ते २१ ची माहिती त्यांना उपलब्ध करून दिलेल्या लॅपटॉपच्या माध्यमातून तातडीने भरण्याचे निर्देश दिले. परंतू अनेक तलाठयांनी अजूनही १ ते २१ ची माहिती ई चावडी मध्ये न भरल्याने शासनाची ई चावडी प्रणाली काही अंशी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील संपुर्ण तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांचेसह संबंधीत अधिकारी यांना धारेवर धरले आहे. ज्या महसुली गांवाचे एक ते एकवीस नमुने अद्यावत करून ई चावडीत अष्टसुत्री काम पुर्ण केलेले नाही, त्या साज्यातील तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांनी २७ मे पर्यंत काम पुर्ण करावे. त्याशिवाय नागरीकांकडून कोणतीही वसुली करण्यात येवु नये. असे सक्त निर्देश दिल्याने जिल्हयातील संपुर्ण तलाठी आणि मंडळ निरीक्षक जोमाने कामाला लागले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये मूल तालुक्यातील सतरा तलाठी आणि पाच मंडळ निरीक्षक कामाला लागले आहेत. तालुक्यात ७६ आबादी गांव असून ३५ रिठी गांव आहेत. एकुण १११ गांवासाठी पाच मंडळ मध्ये एकतीस तलाठी साजे निर्माण करण्यांत आले आहे.