जंगलातून थेट मूल शहरात घुसला रानगवा!

67

मुल – मुल शहराला लागूनच अगदी एक की. मी. अंतरावर जंगल लागून असल्याने २५ मे ला रात्री ११:४५ च्या दरम्यान जंगलातील एक रानगवा भटकुन मूल शहरातील चौखुंडे हेटी व बाजार समितीच्या आवारात फीरतांना तेथील रहिवासी यांना दीसला.
याची माहीती स्थानीक नागरिक विक्की कोहळे यांनी संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे व योगेश गावंडे यांना दीली. माहीती मिळतात संस्थेच्या सदस्यांनी घटणा स्थळी जाऊन तो रानगवा आहे याची खात्री करून वन कर्मचारी यांना मोबाईल द्वारे माहिती दिली.
            वनविभागाचे कर्मचारी, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य व स्थानिक नागरिकांनी त्या रानगव्याला सुरक्षित पणे जंगलाच्या दिशेने परतविले यावेळी मूल प्रादेशिक चे क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के, एफ डी सी एमचे क्षेत्र सहाय्यक आर.जी.कुमरे वनरक्षक एस. आर. ठाकुर उपस्थित होते.
यापूर्वीही याच लागून असलेल्या जंगलातील अस्वल व तिचे तीन पिले उन्हाळ्याच्या दिवसात कर्मवीर महाविद्यालय परिसरात फिरताना विद्यार्थ्यांना दिसले. त्याही वेळेला वनविभागाने गस्त लावले होते.