स्वामी विवेकानंद विद्या मंदीर येथील गुणवंताचा सत्कार संपन्न
मूल :- आजचे युग स्पर्धेचे आहे.यात टिकायचे असेल तर अधिक स्पर्धा असणे ही काळाची गरज लक्षात घेता मूल शहरात केवळ एकच शाळा होती म्हणून स्पर्धा करायला आणि गुणवत्ता टिकवायला आम्ही १९९२मध्ये स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मूल नावाने निर्माण केलेल्या शाळा स्थापनेचे आमचे स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असल्याचे याप्रसंगी बोलताना मत व्यक्त केले.
पुढं बोलताना त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मेहनतीशिंवाय पर्याय नाही.विदयार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी शिक्षकांसह सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे पटवून देत आम्ही शिक्षकांना तसे कार्य करण्यासाठी बाध्य केले व स्पर्धेमधूनच उत्तूंग यश प्राप्त करता येते यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले असे मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले.
फडणवीस वाड्यात आज सकाळी घेण्यात आलेल्या गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष देवराजभाई पटेल,सचिव अनिल संतोषवार,सहसचिव मोती टहलियानी,संचालक मंडळातील संजय चिंतावार,राजू पटेल,मुख्याध्यापक नितिन घरोटे उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेचा दहावीच्या परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला. ११५ विदयार्थी परिक्षेला बसले होते.त्यापैकी ४७ विदयार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले. ४१ विदयार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले तर २७विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
१९९२ मध्ये स्थापन केलेल्या या शाळेने दहावीच्या उत्कृष्ट निकालाची पंरपरा याही वर्षी कायम राखली आहे. त्यात यावर्षी तर १००टक्के निकाल जाहीर झाला आहे याचे संपूर्ण श्रेय शिक्षक वर्ग , विद्यार्थी यांचे असून व्यवस्थापन मंडळाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार झाल्याचे शोभाताई फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या
आसावरी लेनगूरे (९३.८० टक्के),
सलोनी सुरमवार (९३.६०टक्के),
पूर्वा कानमपल्लीवार (९२टक्के),
वंशिका चिताडे (९० टक्के) या चार
विद्यार्थीनीचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शोभाताई फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक नितिन घरोटे यांनी केले.यावेळी पालक वर्ग ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.