मूल मध्ये पावसाचा जोर वाढला, पावसामुळे बळीराजा सुखावला

37

मूल मध्ये पाऊस, बळीराजा सुखावला

मूल :-काही ठिकाणी मुसळधार पाऊस  तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे.  इतरही भागात पाऊस सुरू असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

नागरिकांना तसेच छोटा व्यवसायकांना बुधवार दिवस असल्यामूळे बाजाराचा तसेच तहसील कार्यालय  येणा—या प्रमाणपत्रासाठी धावपळ करीत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे काय करावे आणि काय नको अशी अवस्था येथील विद्यार्थी व नागरीकंची ताराबंळ उडाली होती.

    बहुप्रतिक्षेत असलेल्या पावसाने आज हजेरी लावली. मेघ गर्जनेसह आलेल्या मुसळधार सरीमुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला. या पावसामुळे धान पेरणीची लगबग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी केंद्रात उत्कृष्ट आणि उत्तम दर्जाच्या बियाणे खरेदी साठी शेतक-यांची गर्दी होत आहे. मृग नक्षत्रापासून खरीप हंगामाला सुरुवात झाली. मृग नक्षत्राचा पाऊस पडला नाही. शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज असताना पावसाने दगा दिला. सिंचनाची सोय असलेल्या शेतक-यांनी आपल्या शेतात धानाची पेरणी केली. बाकीच्या शेतक-यांना पावसाची वाट होती. ही आशा बुधवारी शेतक-यांमध्ये निर्माण झाली. बुधवारी दुपारी मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे धान पेरणीसाठी शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूल तालुक्यात धानाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र 22030 हेक्टर आहे. मागील वर्षी 2023 2024 च्या खरीप हंगामामध्ये 19950 हे. क्षेत्रावर रोवणी, 2031 हे. क्षेत्रामध्ये आवत्या आणि 1270 हे. क्षेत्रावर पेरीव भात केलेली होती. याशिवाय तालुक्यात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कापूस, मिरची आणि भाजीपाल्याची लागवड केली जाते. 1717 हे. क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. पावसामुळे बळीराजा सुखावला असून आपल्या शेतकीच्या कामात तो आता व्यस्त दिसणार आहे.