शूरवी महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

41

शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे 21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून संपूर्ण जगाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे या करिता आपल्या भारत देशाने संपूर्ण जगाला योगाचे महत्व प्रतीपादीत केले. त्या अनुषंगाने शुरवी महिला महाविद्यालयातील मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. सदर आंतरराष्ट्रीय योग दिवसाला महाविद्यालयातील
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षा खरासे मॅडम या प्रमुख अतिथी होत्या.
सकाळी आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर व सचिव मा. सुरावार सर यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या हॉलमध्ये विविध योगासने करण्यात आली. प्राचार्या हर्षा खरासे मॅडम यांनी आपल्या संबोधनात ‘करा योग राहा निरोग ‘ चा संदेश देतांना योगासनांचे महत्त्व पटवून दिले..
प्रा. सौरभ तरारे सर यांनी सर्वांचे आभार मानले..