देवनील स्कूल ऑफ नर्सिंग मूल, (आकापुर ) येथे योग शिबिराचे आयोजन

41

मूल,
देवनील स्कूल ऑफ नर्सिंग मूल, (आकापुर ) येथे योग शिबिराचे आयोजन.
सध्याच्या यांत्रिक युगात जनतेला वेगवेगळ्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. काही आजार तर रोजच्या रासायनिक करणाच्या खतावर उत्पादित खण्यामधूनही होत असल्याचे समजते, त्यावर उपचार म्हणून नानातरेचे मेडीसिन घ्यावे लागते. बरेचसे आजार मेडीसिन चे सेवनानेही होतात. हे निदर्शनास येत आहे. यावर उत्तम व मोफत उपाय म्हणून योगा, व्यायाम करणे हाच एकमात्र उपाय असल्याचे सर्व स्तरातून ऐकव्यात येते. हेच दृष्टिकोन पुढे ठेऊन मूल येथील योग प्रशिक्षक सुरेश खियानी यांचे मार्गदर्शनात देवणील स्कूल ऑफ नर्सिंग येथे जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दिनांक २१/६/२०२४ ला योग शिबिर घेण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार देवराव भांडेकर , नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य भावना टेकाम आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते, यावेळी वेगवेगळ्या आजारावर कोणकोणते योग करता येतात याची सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती देऊन प्रशिक्षक सुरेश खियाणी यांनी योगाभ्यास शिकवला . यावेळी प्राचार्या भावना टेकाम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आयोजित योग शिबिरात १५० विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला, जीवनावश्यक महत्वपूर्ण प्रशिक्षण दिल्याबद्द्ल नर्सिंग कॉलेजच्या वतीने सुरेश खीयानी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.