मूल : तालुक्यातील कोसंबी येथील एका महिलेला विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची
घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. शीतल कैलास मोहुर्ले (३१), असे मृत महिलेचे नाव आहे.
शीतल मोहुर्ले ही दुपारच्या सुमारास घरी आराम करीत असताना घोणस जातीच्या सापाने दंश केला. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने प्राथमिक उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून शीतलला मृत घोषित केले. तिला एक सहा वर्षांचा मुलगा आहे. तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post Views: 82