‘महाज्योती’तर्फे मोफत JEE/NEET/MHT-CET – Batch – 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण@ विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा

46

JEE/NEET/MHT-CET – Batch – 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE / NEET / MHT-CET – Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता :-.
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/ असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.
6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
ब. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate) 3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
5. 10 वी ची गुणपत्रिका
6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
7. दिव्यांग असल्यास दाखला
8. अनाथ असल्यास दाखला

एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण

‘महाज्योती’तर्फे मोफत एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण नागपूर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यात येते.

सन २०२४- २५ या वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) संयुक्त गट ब व क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ‘महाज्योती’ ने अर्ज मागविण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू केलेली आहे. अर्ज महाज्योतीच्या या आहेत. www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर मागविले प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.