बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने जनसंवाद अभियानाची सुरुवात

37

बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने जनसंवाद अभियानाची सुरुवात
*मारोड येथे संघटनेचे नेते भाई जगदीश कुमार यांनी दिली भेट
मूल – दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जनसंवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली असून तालुक्यातील मारोड या गावात जाऊन वनजमिन धारकांशी संवाद साधला असता वनजमिन धारकांनी वन विभाग आणि महसूल विभागाने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखविला
यावेळी उपस्थित वनजमिन धारकांना मार्गदर्शन करताना भाई म्हणाले की अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006व नियम 2008सुधारित नियम 2012 अन्वये वन हक्क मिळणे करिता जर आपण अनुसूचित जमाती पैकी असाल तर 13डिसेंबर 2005 पूर्वीचा पुरावा असणे गरजेचे आहे आणि जर आपण अनुसूचित जमाती पैकी नसाल तर तीन पिढीचा पुरावा आवश्यक असल्याचे सांगून मारोड येथील वन जमीन धरकांचे वन हक्क कायदा प्रणाली अंतर्गत दावे पात्र यादीत समाविष्ट करण्यात आले असताना त्यांच्या कब्ज्यात आसलेल्या वाहिती व पेरणी लायक जमिनी निष्कासित करण्यात आल्या असल्याची माहिती वन जमीन धारकांनी सांगितली यावेळी जनसंवाद अभियानात सहभागी असलेल्या मानवी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके यांनी सांगितले की सदर प्रकरणात लक्ष देण्यासाठी विभागीय वन हक्क समिती कडे संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व लोकांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन पाठपुरावा करावा असा सल्ला तिडके यांनी दिला
या जनसंवाद अभियानात बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा नेते अजय भाऊ मंडपे शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्ष सौ इंदिरा बोंदरे सहभागी झाल्या होत्या तर मरोड येथील कवडू गोविंद कोसंकर, बालाजी नारायण अल्लीवर, बेबीताई अभिमन्यू नेवारे मुरलीधर लाहानु वडाई सहित महिला पुरुषांनी जनसंवाद अभियानात सहभाग नोंदवून भाई जगदीश कुमार इंगळे यांचे शब्दसुमनाने स्वागत केले भाई जगदीश कुमार इंगळे
संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना
7796191596