प्रापटी डिलरने पंख्याला गळफास घेवून केली आत्महत्या

43

वणीच्या प्रापर्टी डिलरने मूल येथील लॉज मध्ये संपविले जीवन, आत्महत्येचे कारण समजु शकले नाही मूल : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील प्रापटी डिलरने येथील एका लॉजवर गळफास लावुन आत्महत्या केल्याचे काल राञो उघडकीस आले. सुनिल कृष्णाजी देरकर (53) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नांव असुन त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.
प्रापर्टीचा व्यवसाय करणारे वणी येथील वार्ड नं. 2 मधील सुनील कृष्णाजी देरकर व्यवसायाच्या निमित्ताने 25 जुन रोजी संध्याकाळी 5 वा. मूलला आले. येथील बस स्थानका लगत असलेल्या न्यु उपाध्ये लाँज येथे खोली भाड्याने घेवुन राहत होते. रोज सकाळी 11 वाजता नंतर लाँज मधुन बाहेर जाणे आणि संध्याकाळी परत येणे अशी त्यांची. लाजवरील मुक्काम काळातील दिनचर्या होती. घटनेच्या दिवशी 29 जुन रोजी सकाळी 10 वा. च्या सुमारास खोलीची स्वच्छता करण्यासाठी लाँजच्या नोकराने खोलीचा दार ठोठावला. तेव्हा खोलीमधुन प्रतिसाद मिळाला नाही. देरकर झोपले असावे असे समजुन नोकर निघुन गेला. पुन्हा दुपारी 3 वा. चे दरम्यान नोकराने खोलीचा दार ठोठावला तेव्हा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ठार ठोठावूनही खोलीमधुन प्रतिसाद न मिळाल्याने नोकराला शंका आली. सदर प्रकार त्याने बाहेरगांवी असलेल्या लाँज मालक लोकेश उपाध्याय यांना सांगितला. लागलीच लोकेश उपाध्याय मूलला पोहोचल्यानंतर संध्याकाळी 7 वा. चे दरम्यान पोलीसांना माहीती देण्यात आली. पोलीसांनी लाँजमध्ये येवुन दरवाजा तोडुन आंत प्रवेश केला असता सुनिल देरकर यांनी पंख्याला गळफास लावुन जीवन संपविल्याचे दिसुन आले. आधार कार्डवरील नोंदीवरुन मृतकाची ओडख पटली. घटनेची माहीती मृतकाच्या नातेवाईकाला देण्यात आली. मृतकाचे नातेवाईक आल्यानंतर पंचनामा करून शव विच्छेदन झाल्यानंतर पार्थिव नातेवाईकांना देण्यात आले. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.  घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी करीत आहेत.