बैलबंडीतून आले विद्यार्थी, पालकही भारावले

48

मूल तालुक्यातील हळदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क सजविलेल्या बैलबंडीतून आणण्यात आले. गावातील प्रमुख रस्त्याने ही मिरवणूक भ्रमण करीत शाळेत पोहचली. यावेळी शिक्षकांनी आलेल्या प्रत्येक बालकाचे औक्षण करून गुलाबपुष्प देत स्वागत केले. हा क्षण जणू एका स्वागत समारंभासारखाच वाटत होता. आपल्या चिमुकल्यांचे असे स्वागत पाहून पालकही भारावले.

यावेळी मुख्याध्यापक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शाळेत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. असाच उपक्रम अन्य शाळांनीही राबविला.

प्रदीर्घ उन्हाळ्याच्या प्रदीर्घ  सुटीनंतर सोमवारपासून शाळेचा पहिला टोला वाजला. यात गुलाब
पाकळ्यांची उधळण व औक्षण करूननवागतांसह विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा भरली आणि एकच किलबिलाट झाल्याचा अनुभव यावेळी सर्वांनाच आला. उल्लेखनीय म्हणजे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीनेस्वागत करण्यात आले. गावातूनलहानग्या बालकांची मिरवणूक काढून,
औक्षण करून बैलबंडीतून शाळेपर्यंत आणण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांना ‘तुमचे शाळेत स्वागत आहे, आनंदी राहा’ असे शब्दबोल करीत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली. तालुक्यातीलमूल तालुक्यातील हळदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशाच्या उपक्रमाखाली अवघ्या गावातच जणू यात्रा भरली की काय, असा भास जाणवत होता. असाच प्रत्यय तालुक्यातील शाळांमध्येही आला.
अनेक विद्यार्थ्यांनी गणवेशात प्रवेश केला होता, तर काहींनी आपल्या आवडत्या पोशाखात पहिला दिवस शाळेत घालविला. पहिला दिवस आणि शाळांमध्ये झालेला किलबिलाट मुख्याध्यापकांसह शिक्षकांनाही सुखावून गेला.