लाडकी बहीण योजने साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आता 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

67

मुंबई: मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली असून अंतिम तारीख ही 15 जुलै जाहीर करण्यात आली होती.

पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी प्रतिसाद पाहत मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील महिन्यात 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी महिला गर्दी करत आहे. त्यामुळे या योजनेसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसंच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

2. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.

3.सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

4. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

5. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

6. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

7. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

कोण लाभ घेऊ शकतं? (Who is Eligible Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme)
21-60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महाराष्ट्रातील रहिवासी असावी. त्यांचं कुटुंबातील वार्षिक उत्पन्न आहे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, याशिवाय त्या घरातील कोणीही सरकारी नोकरीतील कर्मचारी नसावे अथवा इनकम टॅक्स भरणारे नसावे.

कोणती कागदपत्र लागणार? (Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme important Documents)
ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना आपलं आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मूळ अधिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साइज फोटो, योजनेचा अर्ज हे सगळं तुम्हाला ग्रामसेविका किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरुन नोंदणी करायची आहे. तर निमशहरी आणि शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसमध्ये ही नोंदणी करायची आहे. या अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सभर केले जातील. लाभार्थींना दर महिन्याला दीड हजार रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार आहे.